शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

कैकाडी वस्ती विकासाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 18, 2014 00:05 IST

चामोर्शी मार्गावर असलेल्या कैकाडी वस्तीमध्ये मूलभूत सायीसुविधा पुरविण्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कैकाडी समाजाच्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गडचिरोली : चामोर्शी मार्गावर असलेल्या कैकाडी वस्तीमध्ये मूलभूत सायीसुविधा पुरविण्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कैकाडी समाजाच्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.मागील अनेक वर्षांपासून चामोर्शी मार्गावरील शहराच्या बाहेर कैकाडी समााजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. या वस्तीमध्ये जवळपास ६०० नागरिक राहत आहेत. मात्र साधे विद्युत खांबसुद्धा या वस्तीपर्यंत आले नाही. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागत आहे. विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करण्याची अडचण होत असल्याने या समाजाचे विद्यार्थी शिकुन मोठे कसे होणार असल्याने असा गहण प्रश्न पालकांना पडला आहे. संपूर्ण शहराला नळांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. शहरात एखादी नवीन वस्ती उदयास येताच त्या वस्तीत विनाविलंब विद्युत व नळाची पाईपलाइन टाकण्यात येते. मात्र दहावर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही या वस्तीला पाणीपुरवठा करण्याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पाईपलाइन टाकण्याविषयी तत्कालीन नगराध्यक्षांना निवेदन दिले. पाईपलाइन टाकण्यासाठी २५ लाख रुपयाचा खर्च येईल असे सांगुन निवेदन देणाऱ्यांना परत पाठविण्यात आले होते. खासदार अशोक नेते यांनी निवडणुकीपूर्वी या वस्तीला भेट दिली होती. भेटीदरम्यान ‘सबका साथ सबका विकास’चा नारा देत या कैकाडी वस्तीला आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. आता ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. केंद्रात त्यांची सत्ता आहे. त्यामुळे निधी खेचून आणून या वस्तीमध्ये विद्युत, नळाद्वारे पाणीपुवठा, रस्ते या सुविधा निर्माण करून देऊन घरकुल बांधून द्यावे, अशी अपेक्षा येथील नागरिक करीत आहेत. नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनींचेही याकडे दुर्लक्ष झाले असल्याने कैकाडी समाजाच्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्या नेत्याच्या वाढदिवशी वस्तीत पेढे वाटून स्वत:ची प्रसिद्धी करणे एवढ्यापुरताच या समाजातील नागरिकांचा वापर केला जातो. निवडणुकीच्यावेळी मतांचा जोगवा मागणारे लोकप्रतिनीधी निवडणूक संपल्यानंतर या वस्तीकडे ढुंकुणही पाहत नाही. या वस्तीतील नागरिकांना किमान माणूस म्हणून जगता यावे यासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, अशी मागणी बाशीद शेख यांच्यासह कैकाडी समाजातील नागरिकांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)