शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरकरांच्या कपडा बँकेने दिली कारसपल्लीवासीयांना ऊब

By admin | Updated: January 10, 2017 00:56 IST

चंद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव शरद राजने यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वत:ला सामाजिक कामात झोकून घेतले.

खामगाववरूनही मदत : गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळाळलाभामरागड : चंद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव शरद राजने यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वत:ला सामाजिक कामात झोकून घेतले. त्यातूनच सुमती कपडा बँकेची निर्मिती झाली. या कपडा बँकेच्या माध्यमातून शरद राजने व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी भामरागड तालुक्यातील कारसपल्ली गावात शेकडो नागरिकांना कपड्याचे वाटप केले. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव झळाळलेला होता.भामरागड हा राज्यातील सर्वात मागास तालुका, या भागात अजूनही विकासाची प्रक्रिया पोहोचलेली नाही. दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. अशा परिस्थितीत कारसपल्ली गावात कपडे वाटप करायचे निश्चित करण्यात आले. चंद्रपूर येथील तुकूम परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते शरद राजने यांनी या कामात पुढाकार घेतला. त्यांनी काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या सुमती कपडा बँकेत मोठ्या प्रमाणावर कपडे जमा झाले होते. या कपड्यातील वापरण्यायोग्य कपडे निवडून त्यांनी ते कारसपल्ली व कारसपल्ली टोला या गावातील १०० नागरिकांना वाटले. यावेळी महिलांना साडी, पुरूषांना शर्ट, पॅन्ट, लहान मुलांना फ्रॉक व कपडे तसेच जर्किन व स्वेटरही वितरित करण्यात आले. सदर कापड चंद्रपूर येथील सुधाकर कस्तुरे, गुलाबराव खंडाळे, अ‍ॅड. प्रकाश गजबे, वसंत उपरे, घनश्याम वनकर, राज तिवारी, मुकंद आंबेकर, आशिष धोटे, प्रशांत रणदिवे यांच्या माध्यमातून तुकूम, ऊर्जानगर वसाहत व अन्य भागातून जमा करण्यात आले होते. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथूनही या कपडा बँकेला कपडे प्राप्त झालेत. त्यानंतर कपडे वाटपाचा छोटेखानी समारंभ सुमती कपडा बँकेचे अध्यक्ष व चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव शरद राजने, सहायक निबंधक प्रशांत धोटे, बुर्रेवार, अहेरीच्या हेल्पिंग हॅन्डस् संघटनेचे अध्यक्ष प्रतिक मुधोळकर यांच्या उपस्थितीत पार पडला.पुढील महिन्यातही आणखी एक कार्यक्रम याच भागात घेतला जाणार असल्याची माहिती शरद राजने यांनी याप्रसंगी दिली. यावेळी सुमती कपडा बँकेचे अध्यक्ष सुमती कपडा बँकेचे कारसपल्लीवासीयांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)