शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चिंचगुंडीतील लघुसिंचन योजनेत बिघाड

By admin | Updated: September 3, 2016 01:26 IST

येथून तीन किमी अंतरावर असलेल्या चिंचगुंडी येथील लघुसिंचन योजना बंद पडली असल्याने या योजनेवर अवलंबून असलेले धानपीक धोक्यात आले आहे.

धानपीक धोक्यात : कार्यालयास कुलूप ठोकण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशाराअहेरी : येथून तीन किमी अंतरावर असलेल्या चिंचगुंडी येथील लघुसिंचन योजना बंद पडली असल्याने या योजनेवर अवलंबून असलेले धानपीक धोक्यात आले आहे. त्यामुुळे सदर योजना दुरूस्त करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.चिंचगुंडी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांना पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी १५ वर्षांपूर्वी उपसा सिंचन योजना बांधण्यात आली. या योजनेमुळे जवळपास ५०० हेक्टर शेती सिंचनाखाली आली व गावातील १०० पेक्षा अधिक शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. वर्षाचे ३०० रूपये पाणी कर भरत होते. सात वर्षांपूर्वी येथील दोनपैकी एका मोटारमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे एकाच मोटारवर काम सुरू होते. काही दिवसांपूर्वी दुसऱ्याही मोटारमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे आता ही योजना पूर्णपणे बंद पडली आहे. योजना सुरू न केल्यास ७ सप्टेंबर रोजी सिंचन विभागाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा शेतकरी सेवा संघाचे संयोजक रमेश चुक्कावार यांनी दिला आहे. याबाबत शाखा अभियंता के. गोणीबसप्पा यांना विचारणा केली असता, ग्रामस्थांनी पाणी सुरक्षा संस्था स्थापन करून ही योजना राबवावी, गावकरी समोर येत नसल्याने आम्ही ही योजना राबवित आहोत. निधी अभावी दुरूस्ती रखडली आहे. निधीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)उडवाउडवीची उत्तरेयोजना दुरूस्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केल्यास सदर योजना विद्युत पुरवठा नसल्याने बंद असल्याचे सांगितल्या जाते व विद्युत विभागाशी संपर्क केल्यास पुरवठा ठिक आहे. लघुसिंचन विभागाने लावलेली डीपी खराब झाली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे योजना नेमकी कशामुळे बंद आहे, हे कळण्यास मार्ग नाही.