शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

नवाेदय-शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षकांचे उद्बाेधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST

देसाईगंज : २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य व उत्स्फूर्त मार्गदर्शन शिक्षकांकडून मिळावे व ...

देसाईगंज : २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य व उत्स्फूर्त मार्गदर्शन शिक्षकांकडून मिळावे व त्यात विद्यार्थी यशस्वी व्हावे. या हेतूने शिक्षण विभाग पं. स. देसाईगंज अंतर्गत शिक्षकांना उद्बोधन वर्गातून मार्गदर्शन करण्यात आले.

या उद्‌बोधन वर्गात चंद्रपूर येथील ‘झटपट गणित’ पुस्तकाचे लेखक तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बालाजी बावणे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गटसमन्वयक विजय बन्सोड, आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सुलभा प्रधान, केंद्रप्रमुख ब्रह्मानंद ऊईके उपस्थित होते. नवोदय किंवा शिष्यवृत्तीसारख्या परीक्षा या जीवनातील स्पर्धात्मक परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त असल्याने या उद्बोधनवर्गात प्राप्त झालेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना पुरेपूर लाभ द्यावा, असे आवाहन विजय बन्सोड यांनी प्रास्ताविकेतून केले. उद्बोधन वर्गाचे संचालन विषय साधन व्यक्ती होमा शहारे तर आभार रानू ठाकूर यांनी मानले. यशस्वितेसाठी आर. जी. म्हस्के यांच्यासह गटसाधन केंद्राच्या अल्का सोनेकर, वैशाली खोब्रागडे व रणजित चौधरी यांनी सहकार्य केले. उद्बोधन वर्गाला जि.प., न.प.व खासगी शाळांचे ५९ शिक्षक उपस्थित होते.