शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १ कोटी ३२ लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: April 25, 2015 01:40 IST

येथील नगर परिषद कार्यालयात असलेल्या दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे आरक्षण केंद्रात रेल्वे प्रवासाचे आरक्षण करून वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यातील २९ हजार ९४३ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला.

गडचिरोली : येथील नगर परिषद कार्यालयात असलेल्या दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे आरक्षण केंद्रात रेल्वे प्रवासाचे आरक्षण करून वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यातील २९ हजार ९४३ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला. या आरक्षण केंद्राच्या माध्यमातून रेल्वेला वर्षभरात १ कोटी ३२ लाख १९ हजार ३३५ रूपयांच्या उत्पन्न मिळाले आहे.
१ मार्च २०१४ ते ३० एप्रिल २०१५ या आर्थिक वर्षात या केंद्राच्या माध्यमातून २९ हजार ९४३ नागरिकांनी आरक्षण मिळवून रेल्वे प्रवास केला. २०१४ च्या एप्रिल महिन्यात या केंद्रातून दोन हजार ९५२ नागरिकांनी आरक्षण मिळवून रेल्वे प्रवास केला. यातून रेल्वेला १३ लाख ७० हजार ८५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. मे महिन्यात दोन हजार ५८५ नागरिकांनी रेल्वेचे आरक्षण केले. यातून ११ लाख २५ हजार ४६५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. जून महिन्यात दोन हजार २९२ नागरिकांच्या आरक्षणातून नऊ लाख ४० हजार ९१० रूपयांचे उत्पन्न मिळाले. जुलै महिन्यात दोन हजार ६३७ नागरिकांनी या केंद्रातून रेल्वे प्रवासाचे आरक्षण केले. यातून ११ लाख ४९ हजार ५० रूपयांचे तर आॅगस्ट महिन्यात दोन हजार ५२४ प्रवाशांच्या माध्यमातून या रेल्वे आरक्षण केंद्रास ११ लाख ४९ हजार ६५० रूपयांचे उत्पन्न मिळाले. सप्टेंबर महिन्यात दोन हजार १६१ नागरिकांच्या प्रवासातून नऊ लाख २५ हजार ३३१ तर आॅक्टोबर महिन्यात दोन हजार ३६९ प्रवाशांच्या आरक्षणातून आरक्षण केंद्रास १० लाख २२ हजार ३८० रूपयांचे उत्पन्न मिळाले. नोव्हेंबर महिन्यात या आरक्षण केंद्रातून दोन हजार ८८७ नागरिकांनी रेल्वे प्रवासाचे आरक्षण केले. यातून १२ लाख ३६ हजार रूपये तर डिसेंबर महिन्यात दोन हजार ६६३ प्रवाशांच्या आरक्षणातून या आरक्षण केंद्रास ११ लाख २१ हजार ९९५ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
२०१५ या वर्षातील जानेवारी महिन्यात एकूण दोन हजार १२७ नागरिकांनी रेल्वे प्रवासाचे आरक्षण केले. यातून आठ लाख ८४ हजार ३९०, फेब्रुवारी महिन्यात दोन हजार २३५ प्रवाशांच्या आरक्षणातून या केंद्रास नऊ लाख ८९ हजार ३७५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. मार्च महिन्यात दोन हजार ५११ नागरिकांनी या केंद्रातून रेल्वे प्रवासाचे आरक्षण केले. यातून या केंद्रास १३ लाख चार हजार ८०५ रूपयांचे उत्पन्न मिळाले.