काेटरा येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST2021-02-10T04:36:59+5:302021-02-10T04:36:59+5:30

काेरची : तालुक्याच्या काेटरा येथे जिल्हा काँग्रेसचे महासचिव मनाेज अग्रवाल यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ...

Inauguration of Kabaddi competition at Katra | काेटरा येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

काेटरा येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

काेरची : तालुक्याच्या काेटरा येथे जिल्हा काँग्रेसचे महासचिव मनाेज अग्रवाल यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून अरुणा विद्यालयाचे संस्थापक सचिव प्रफुल घुटके, गाव पुजारी नेमसाय मडावी, पं. स. चे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य कचरी काटेंगे, सरपंच राहुल मलगाम, पोलीस पाटील लीनाताई तांडेकर, उपसरपंच देवचंद दखणे, माजी उपसभापती गोविंद दरवडे, नगरसेवक घनश्याम अग्रवाल, माजी सरपंच धनसिंग कल्लो, तुलाराम मडावी, दूरपाल नैताम, संध्या सहारे, सविता मडावी, प्राचार्य आर.सी. मच्छीरके, शिक्षक रमेश नाणे, रमेश सहारे, अरविंद काशिवार, नमो मेश्राम आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर कोटरा गावातीलच युवकांचा कबड्डीमध्ये पहिला सामना झाला. यामध्ये जयसेवा क्रीडा मंडळ निंदनचुवा विरुद्ध नवयुवक क्रीडा मंडळ कोटरा यात झाला. यात निंदनचुवाचया चमुने विजय मिळविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश नाणे यांनी तसेच सूत्रसंचालन शेळके यांनी केले.

Web Title: Inauguration of Kabaddi competition at Katra