शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत संकरित आंब्यांचाच बाेलबाला, गावठी झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : वातावरणातील बदलामुळे यावर्षी गावठी आंबे फारशा प्रमाणात आले नाहीत. त्यामुळे बाजारात गावठी आंब्यांचे दर्शन ...

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : वातावरणातील बदलामुळे यावर्षी गावठी आंबे फारशा प्रमाणात आले नाहीत. त्यामुळे बाजारात गावठी आंब्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. शहरात केवळ संकरित आंब्यांची चलती असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या कालावधीत संकरित आंब्यांकडे शहरी ग्राहक वळत चालला असला तरी ग्रामीण भागातील ग्राहकाला अजूनही गावठी आंबाच पसंत पडतो. ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांना गावठी आंब्याचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळे जास्तीचे पैसे देऊन आंबा खरेदी करण्यास तयार हाेतात. ग्रामीण भागातील काही नागरिक गावठी आंबे विक्रीसाठी शहरात आणतात. मात्र मे महिन्याचा दुसरा आठवडा उलटूनही अजूनपर्यंत गावठी आंबे बाजारात आले नाहीत. फेब्रुवारी महिन्यात आलेल्या जाेरदार पावसामुळे वातावरणात बदल हाेऊन याचा परिणाम आंब्यांच्या फळधारणेवर झाला. 

बेगमपल्ली १०० रूपये किलाेबेगमपल्ली आंबा आकाराने माेठा राहतो. तसेच रस अतिशय घट्ट हाेतो. रस बनविण्यासाठी बेगमपल्ली आंबा सर्वात चांगला मानला जाताे. त्यामुळे रस बनविण्यासाठी हाच आंबा खरेदी करतात. सध्या हा आंबा १०० रूपये किलाे दराने बाजारात उपलब्ध आहे.

बेंगमपल्ली, दसेरीची चलतीसध्यास्थितीत गडचिराेलीच्या बाजारात बेंगमपल्ली, दसेरी व लंगडा या तीन संकरित आंब्यांची चलती असल्याचे दिसून येते. बेंगमपल्ली आंबा रस बनविण्यासाठी तर दसेरी व लंगडा हे आंबे चाेखून खाण्यासाठी वापरले जातात. गावठी आंब्यांच्या तुलनेत हे आंबे गाेड राहतात. इतर प्रकारचे आंबे गडचिराेली जिल्ह्यातील नागरिक सहजासहजी खरेदी करीत नाही.

गावठीची चव खाल्ल्याशिवाय कळत नाहीगावठी आंब्याचे विविध प्रकार आहेत. काही आंबे आंबट, तेलकट, गाेड राहतात. त्यामुळे विश्वास ठेवून गावठी आंबा खरेदी न करता पहिले एखादा आंबा चव घेऊन बघावा. त्यानंतरच आंबा खरेदी करावा. संकरित आंब्यांचेही अनेक प्रकार असले तरी हे आंबे सहज ओळखता येतात. त्यामुळे रस बनविण्यासाठी की, चाेखण्यासाठी आंबे खरेदी करायचे आहेत. त्यानुसार आंब्यांची निवड करावी. 

 

टॅग्स :Mangoआंबा