शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: September 15, 2014 00:08 IST

आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लहान- मोठे पुले वाहून गेले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील गिट्टी उखळली असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

गडचिरोली : आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लहान- मोठे पुले वाहून गेले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील गिट्टी उखळली असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. आठ दिवसांचा कालावधी लोटूनही प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे या मार्गावरून गावकरी जीव धोक्यात घालून नाल्यातून प्रवास करीत आहेत. सदर पुलांची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मागील १ महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने आठ दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आला. या पूरात निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले असलेले पूल तुटले आहेत. दुर्गम भागातील जवळपास असे २० पूल तुटले आहेत. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे व पुरामुळे अनेक मार्ग खरडून गेले आहेत. या मार्गावर मोठ- मोठे खड्डे पडले असल्याने मार्गक्रमण करणे, अशक्य झाले आहे. भामरागड, एटापल्ली, कोरची, सिरोंचा, धानोरा या दुर्गम भागातील नागरिक बऱ्याचवेळा तक्रार करीत नाही. त्यामुळे या ठिकाणच्या समस्या लक्षात येत नाही. पूल तुटल्याने मार्ग खरडून गेल्याने मागील आठ दिवसांपासून या गावांमधील नागरिकांना दुसऱ्या गावी जाणे शक्य होत नाही. काही गावातील विद्यार्थी नाल्याच्या पाण्यातून प्रवास करीत आहेत. एखादे दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर अंदाज चुकून मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्गम भागातील पूल व रस्त्यांची दूरवस्था झाली असल्याने ग्रामसेवक, तलाठी यांनी जाणेच बंद केले आहे. त्यामुळे या गावांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील विद्युत पुरवठा मागील आठ दिवसांपासून बंद आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी गावांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर सदर समस्या किमान एक महिना मार्गी न लावण्याची गडचिरोली जिल्ह्याच्या प्रशासनाला सवयच झाली आहे. (नगर प्रतिनिधी)