शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांच्या मारहाणीमुळे मजूर दहशतीत

By admin | Updated: December 25, 2016 01:45 IST

एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड पहाडीवर खासगी कंपनीकडून लोह खनिज प्रकल्पासाठी उत्खननाचे

परिसरातील गावामध्येही दहशत : काम बंद होण्याची शक्यता एटापल्ली : एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड पहाडीवर खासगी कंपनीकडून लोह खनिज प्रकल्पासाठी उत्खननाचे काम मागील सहा ते आठ महिन्यांपासून सुरू होते. शुक्रवारी या कामावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवून या कामावरील मजुरांना बेदम मारहाण केली व पुन्हा कामाकडे न फिरकण्याची तंबी दिली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर २००६ मध्ये खासगी कंपन्यांना लिज उत्खनन कामासाठी मंजूर करण्यात आली होती. परंतु मागील १० वर्षात येथे काम सुरू झाले नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या भागात काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची सूचना केली. त्यानंतर या परिसरात पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले व खासगी कंपनीकडून उत्खननाचे काम सुरू झाले. परिसरातील अनेक गावातून ३००, साडेतीनशे मजूर व बाहेर ठिकाणाहून वाहतुक कामासाठी ट्रक बोलाविण्यात आले होते. शुक्रवारी नक्षलवाद्यांनी ट्रक ड्रायव्हरच्या तळ हातावर वर पाठीवर बेदम मारहाण केली. यापुढे कामावर आले तर जीवानिशी ठार करू, अशी धमकी दिली, अशी माहिती काही ट्रक चालकांनी लोकमतशी बोलताना दिली. नक्षलवाद्यांच्या मारहाणीनंतर ट्रक चालक व मजूर पाच ते सहा किमी अंतर पायी चालून मुख्य रस्त्यावर आले व तेथून ते आपल्या गावी रवाना झाले. काही ट्रक चालक व मजुरांना तीन तास ओलीस ठेवूनही मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे आता सुरजागड पहाडीवरील काम बंद होण्याची शक्यता आहे. तर केंद्र सरकारने आणखी काही सुरक्षात्मक बाबी निर्माण करून दिल्या तर पुन्हा येथे काम सुरू होऊ शकते, असेही काहींचे म्हणणे आहे. सध्या तरी मात्र नक्षलवाद्यांच्या या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. शुक्रवारच्या या घटनेनंतर एटापल्ली पोलीस व जिल्हा पोलीस मुख्यालयातूनही या घटनेची चौकशी सुरू झाली आहे. या घटनेचे कारण काय, याचा शोध घेतल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)