शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.समोर आशांचे धरणे तर आरमोरीत चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 05:00 IST

महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने आयटकच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जमा होऊन नारेबाजी केली. कोरोना काळातील सेवेसाठी प्रतिदिन ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासह इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकोरोना काळातील सेवेसाठी प्रतिदिन ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता द्या

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली  : जिल्ह्यातील शेकडो आशा सेविकांनी बुधवारी (दि.१६) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे आरमोरीत अन्यायग्रस्त सफाई कामगारांनी रास्ता रोको करून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे बुधवार आंदोलनवार ठरला.महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने आयटकच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जमा होऊन नारेबाजी केली. कोरोना काळातील सेवेसाठी प्रतिदिन ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासह इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, आयटकचे जिल्हा सचिव ॲड.जगदीश मेश्राम, आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव रजनी गेडाम यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. १५ जूनपासून कोरोना कामासहित सर्वच कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्यभरातील आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई येथे आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ११ जून रोजी आयोजित केली होती. त्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. आशा व गट प्रवर्तक यांच्याकडून मार्च २०२० पासून कोरोनाचे काम करून घेतले जात आहे. त्यामुळे इतर कामे करण्यात वेळ मिळत नाही. केंद्र सरकार आशांना फक्त दरमहा एक हजार रुपये देत आहे. इतर कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देत आहे. कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता म्हणून आशा व गट प्रवर्तक यांना प्रतिदिन ५०० रुपये द्या, अशी मागणी करण्यात आली. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी इतरही अनेक मागण्यांवर चर्चा झाली. पण प्रोत्साहन भत्त्याच्या मुद्यावर निर्णय झाला नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामagitationआंदोलन