शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्, राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शाळांनाही सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

महाविद्यालये व अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. साथरोग अधिनियम १८९७ च्या खंड २, ३ व ४ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार याबाबतचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मात्र शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापकांना मुख्यालयी (आपापल्या शाळांमध्ये) राहणे सक्तीचे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : शिक्षकांना मात्र मुख्यालयी राहणे सक्तीचे

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातीलही शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. साथरोग अधिनियम १८९७ च्या खंड २, ३ व ४ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार याबाबतचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मात्र शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापकांना मुख्यालयी (आपापल्या शाळांमध्ये) राहणे सक्तीचे करण्यात आले आहे.
शहरी भागातील शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्यांना शासनाने सोमवारपासूनच सुट्या जाहीर केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातीलही शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्या बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पासह जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळे बंद राहतील. स्वागत समारंभ, अन्नदान यासारखे कार्यक्रम घेता येणार नाही. मंडई भरविता येणार नाही. लोकांचा जमाव होऊन संसर्ग वाढेल, असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. २५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. हॉटेल व लॉज मालकांनी बाहेरून येणाºया व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्यावी. राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमही रद्द करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. कोरोनाविषयी समाजमाध्यमांवर अफवा पसरवून भिती निर्माण करणाºयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

वयस्क नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी
५० पेक्षा अधिक वयाचे व्यक्ती तसेच आजारी नागरिक यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह, रक्तदाब असे आजार असल्यास प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी. खोकला, सर्दी, तापाची लक्षणे एकत्रित जाणवल्यास घाबरून न जाता जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करावी. समाजात सध्यास्थितीत कोरोना रूग्ण म्हणजे गुन्हेगार किंवा तो वेगळा आहे, अशी वागणूक दिली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे रूग्ण तपासणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता राहते. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित रूग्णाचे खच्चीकरण न करता त्याला आरोग्य तपासणीसाठी त्याला प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


आरोग्य यंत्रणा सज्ज
जिल्ह्यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांना कोरोनाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :Schoolशाळा