शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
3
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
4
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
5
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
6
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
7
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
8
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
9
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
10
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
11
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
12
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
13
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
14
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
15
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
19
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
20
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी झटताहेत आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. तसेच बहुतांश नागरिक ग्रामीण भागात राहतात. या नागरिकांना जगामध्ये चालणाºया घडामोडींची फारशी माहिती राहात नाही. जगभरात कोरोना विषाणूचे तांडव सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव न होऊ देण्यात आरोग्य विभागाकडून केली जात असलेली जनजागृती महत्वाची ठरली आहे.

ठळक मुद्देकोरोनाशी लढ्यात महत्त्वाची भूमिका : गावागावात जनजागृती व उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनमुळे एकीकडे बहुतांश सरकारी कर्मचारी घरात आराम करत आहेत. मात्र आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात अग्रणी राहून दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी अविरतपणे झटत आहेत. संशयित रुग्णांवर उपचार करण्यासोबतच संसर्गापासून स्वत:चा कसा बचाव करावा याबाबत शहरी, ग्रामीण व दुर्गम भागात जागृती करत आहेत. एवढेच नाही तर इतर आजारांसाठीही अविरतपणे रुग्णसेवा करत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. तसेच बहुतांश नागरिक ग्रामीण भागात राहतात. या नागरिकांना जगामध्ये चालणाऱ्या घडामोडींची फारशी माहिती राहात नाही. जगभरात कोरोना विषाणूचे तांडव सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव न होऊ देण्यात आरोग्य विभागाकडून केली जात असलेली जनजागृती महत्वाची ठरली आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यास परिस्थिती सांभाळणे कठीण होईल, ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या कर्मचारी व अधिकाºयांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर विशेष भर दिला आहे. आशा वर्कर, परिचारिका, डॉक्टर, आरोग्य विभागातील अधिकारी यांनी सर्वांनी स्वत:ला जनजागृतीच्या मोहिमेत झोकून दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:चा कसा बचाव करावा, या विषयी जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळेच दुसºया जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या व्यक्तीची माहिती गावातील नागरिक आरोग्य व पोलीस विभागाला देत आहेत. तसेच संबंधित व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवत आहेत. गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
एखाद्या कामासाठी जाताना अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले जात आहे. पुणे, मुंबईतील नागरिकांना जे जमले नाही ते येथील नागरिक करून दाखवित आहेत. त्यामुळेच गडचिरोली जिल्हा अजुनही कोरोनामुक्त राहिला आहे.
बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवले जाते. या नागरिकांची नियमित तपासणी करणे, एखादा संशयीत रूग्ण आढल्यास त्याला तत्काळ गडचिरोली येथे पाठविणे आदी कामे केली जात आहेत.

कमी कर्मचारी असतानाही उत्तम काम
गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टरांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य कर्मचाºयांचीही जवळपास २५ टक्के पदे रिक्त आहेत. खासगी दवाखाण्यात जाऊन उपचार घेण्याची आर्थिक कुवत येथील नागरिकांमध्ये नाही. त्यामुळे सरकारी आरोग्य सेवेवरच नागरिकांना अवलंबून राहावे लागते. नियमित आरोग्य सेवा देतानाच आरोग्य कर्मचाºयांना कोरोनाशीही लढावे लागत आहे. आरोग्य कर्मचाºयांनी आजपर्यंत केलेले काम प्रशंसेस पात्र ठरले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर