शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गातून धोक्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे मार्ग गेल्याने शहराचे दोन भागात विभाजन झाले. पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चीम भागात जाण्यासाठी भूयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे पूर्वी असणारे रेल्वे फाटक तसेच कुरखेडा व लाखांदूर बाजूकडील मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला. परिणामी या ठिकाणी दोन्ही बाजूला मोठे चौक निर्माण झाले.

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्थेची मागणी : महामंडळाच्या बसगाड्यांना वळविण्यासाठी जागेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज येथे रेल्वेच्या भूयारी मार्गामुळे चौकात वाहनांची गर्दी वाढत असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना सुद्धा वळविण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे रेल्वेच्या भूयारी मार्गातून धोकादायक वाहतूक होत असल्याचे दिसून येते.देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे मार्ग गेल्याने शहराचे दोन भागात विभाजन झाले. पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चीम भागात जाण्यासाठी भूयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे पूर्वी असणारे रेल्वे फाटक तसेच कुरखेडा व लाखांदूर बाजूकडील मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला. परिणामी या ठिकाणी दोन्ही बाजूला मोठे चौक निर्माण झाले. या दोन्ही चौकात प्रवाशी वाहनांनी आपला ठिय्या मांडला. या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.शहराच्या दोन भागाच्या आवागमनासाठी भूयारी मार्गाची निर्मिती झाली असून हा मार्ग नागमोडी वळणाचा आहे. त्यातच भूयारी मार्गाची उंची मर्यादित असून काही अवजड वाहने सरळ कुरखेडा मार्गावरून बायपास मार्गाने जातात. तसेच लाखांदूर मार्गाने सुद्धा अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. दरम्यान भूयारी मार्गाच्या तोंडावरच मोठ्या संख्येने प्रवासी वाहने उभी राहत असल्याने भूयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी जागा राहत नाही. ही समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून कायम आहे.देसाईगंज शहरातील बसस्थानक हे आरमोरी-कुरखेडा या राज्य महामार्गावर असल्याने कमी पल्ल्याच्या गाड्यांना वळावे लागते. पण वाहनांच्या गर्दीमुळे अनेक वाहकांना बसगाड्या वळविताही येत नाही. कारण त्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. वाहतुकीच्या कोंडीची ही समस्या मार्गी लावण्यासाठी चौकातील उभ्या वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा