शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या बसस्थानकाचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

गडचिरोली हे जिल्हास्थळ असल्याने दुसऱ्या जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या अनेक बसगाड्या गडचिरोली बसस्थानकावर येतात. तसेच जिल्हाभरातही अनेक बसगाड्या गडचिरोली येथून सोडल्या जातात. त्यामुळे गडचिरोली बसस्थानकावर प्रवाशांची व बसगाड्यांची नेहमीच गर्दी राहते. पुरेशा जागेअभावी प्रवाशांची अडचण वाढली होती. बसस्थानकाची इमारत जुनी व लहान होती.

ठळक मुद्देदीड वर्षानंतर प्रवाशांसाठी खुले : कामाची गती वाढविण्याची प्रवाशांची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर गडचिरोली येथील बसस्थानकाचे अर्धे काम पूर्ण झाले आहे. सदर बसस्थानक प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर उर्वरित बसस्थानकाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले असल्याने सदर जागा टीन टाकून बंद करण्यात आली आहे.गडचिरोली हे जिल्हास्थळ असल्याने दुसऱ्या जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या अनेक बसगाड्या गडचिरोली बसस्थानकावर येतात. तसेच जिल्हाभरातही अनेक बसगाड्या गडचिरोली येथून सोडल्या जातात. त्यामुळे गडचिरोली बसस्थानकावर प्रवाशांची व बसगाड्यांची नेहमीच गर्दी राहते. पुरेशा जागेअभावी प्रवाशांची अडचण वाढली होती. बसस्थानकाची इमारत जुनी व लहान होती. या सर्व अडचणी लक्षात घेऊन शासनाने बसस्थानकाचा विस्तार करण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. बसस्थानकाचे नूतनीकरण व विस्तार करण्याच्या कामाला दीड वर्षापूर्वी सुरूवात झाली. मात्र काम अतिशय संथगतीने झाल्याने दीड वर्षाच्या कालावधीत केवळ अर्धेच काम पूर्ण झाले. ज्या ठिकाणी काम झाले तो बसस्थानकाचा परिसर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे तर उर्वरित अर्ध्या जागेवर बांधकाम सुरू आहे.समोरच्या बाजूने कंत्राटदाराने टीन लावून ही जागा बंद केली आहे. समोरच्या भागात मोठ्या प्रमाणात रेती डम्पिंग करून ठेवली आहे. नवीन बसस्थानकाच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. अर्धे काम करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला तर उर्वरित काम करण्यासाठी आणखी किती दिवस लागेल, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.बसस्थानकाचे विस्तारिकरण करताना जुन्या इमारतीला जोडून नवीन फलाट बांधले आहे. तसेच शौचालय व इतरही सोयीसुविधा तयार करून द्यायच्या आहेत. या सर्वांचा विचार केल्यास पुन्हा अर्ध्यापेक्षा अधिक बांधकाम शिल्लक आहे. नवीन बांधकामात बसस्थानकाची सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. कामाची गती वाढवून उर्वरित काम लवकर करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :state transportएसटी