शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

माणिकगड पहाडावरून गारगोट्यांची तस्करी

By admin | Updated: September 21, 2014 23:51 IST

जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील जंगल परिसरातून गारगोट्या गोळा करून तस्करी केली जात असल्याची माहिती आहे. सदर गारगोट्या जयपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये नेल्या जात आहे.

पाटण : जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील जंगल परिसरातून गारगोट्या गोळा करून तस्करी केली जात असल्याची माहिती आहे. सदर गारगोट्या जयपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये नेल्या जात आहे. या परिसरात सोनापूर येथे तपासणी नाका असूनही ही तस्करी सुरूच असल्याने तपासणी नाक्यावरील कर्मचारी करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुक्यातील तुमरीकुडा, नाईकनगर, पाटण, पुन्नागुडा, गणेरी, भाईठार, महाराजगुडा, सेवादासनगर, जिवती आदी परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात गारगोट्या आढळून येतात. या जंगलातील गारगोट्याची अवैधरित्या उचल करून ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. जंगलातील गारगोट्या जमा करण्याकरिता शाळकरी मुलांचाही वापर केला जात असून त्यांना १५० ते २०० रुपये मजुरी दिली जात असल्याची माहिती आहे. जंगल परिसरातील काही नागरिक गारगोट्या गोळा करण्याचे काम करतात. अशा नागरिकांकडून अत्यल्प दराने गारगोट्यांची खरेदी करून ती मोठ्या व्यापाऱ्यांना विक्री केली जात असून याचा मुख्य दलाल गडचांदूर येथील असल्याची माहिती आहे.या परिसरात सोनापूर येथे वनविभागाचा तपासणी नाका आहे. गौणखनिज व वनातील मौल्यवान वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी येथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, याच रस्त्याने गारगोट्यांची तस्करी राजरोसपणे सुरू आहे. ट्रकद्वारे गारगोट्यांची तस्करी सुरू असून पहिल्यांदा गडचांदूर व नंतर तेथून औरंगाबाद, जयपूरसारख्या ठिकाणी या गारगोट्या नेल्या जात आहे. या भागातील बहुतांश वनाधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता गडचांदूर, राजुरा अथवा चंद्रपूरसारख्या ठिकाणी राहून सेवा बजावत असल्याने या तस्करीवर आळा घालण्यात त्यांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच या भागात वनाधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर राहात असल्याने या तस्करांचे चांगलेच फावत आहे.