लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर गाव परिसरात ३० हजारावर लोकसंख्या आहे. सदर भाग अतिशय अविकसित आहे. या भागाच्या विकासासाठी कमलापूरला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात पालकंत्र्यांना निवेदन देण्यात आले.कमलापूर परिसरात मूलभूत समस्यांची भरमार आहे. या भागात अनेक मूलभूत समस्यांचा अभाव आहे. या भागात अनेक गावे येत असतानाही उच्च शिक्षणाची सोय नाही. अहेरी अथवा गडचिरोली येथे या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. दुर्गम भागात रस्ते वीज बससेवा उपलब्ध नाही. वंदनीय तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेली भारतातील पहिली आश्रम शाळा येथे आहे.कमलापूरला तालुक्याचा दर्जा मिळाल्याशिवाय या भागाचा विकास शक्य नाही. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी भामरागड तालुका निर्मितीनंतर कमलापूरला तालुक्याचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतू त्यानंतर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले असताना कमलापूरला तालुक्याचा दर्जा देण्यात आला नाही. गडचिरोली जिल्ह्यातील नवीन तालुक्याच्या निर्मितीकडे शासनाचे कायम दुर्लक्ष राहिले आहे. या भागातील नागरिकांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन कमलापूरला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.पालकमंत्री आत्राम यांनी लवकरच अहेरी जिल्हा निर्माण करून कमलापूर तालुका निर्माण केला जाईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना सरपंच रजनीता मडावी, सांबय्या रालाबंडीवार, गोकुल भट, पवन ताटीकोंडावार, राजन्ना दैदावार, रमनय्या ओलेटीवार, सत्यनारायण रेपालवार उपस्थित होते.
तालुक्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:37 IST
अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर गाव परिसरात ३० हजारावर लोकसंख्या आहे. सदर भाग अतिशय अविकसित आहे. या भागाच्या विकासासाठी कमलापूरला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात पालकंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे
ठळक मुद्देकमलापुरातील नागरिकांची मागणी : अनेक समस्यांमुळे विकास दूर