शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांना आविसंचा घेराव

By admin | Updated: June 4, 2015 01:31 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या सिरोंचा शाखेच्या वतीने बुधवारी सकाळी ....

सिरोंचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या सिरोंचा शाखेच्या वतीने बुधवारी सकाळी कारसपल्ली गावाजवळ पालकमंत्र्यांना हजारो कार्यकर्त्यांनी घेराव घातला. यावेळी खराब झालेल्या धानाचे पोते रस्त्यावर ठेऊन कार्यकर्ते ठिय्या देऊन होते. पालकमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा सिरोंचाकडे जात असताना कारसपल्ली येथे हे आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री आपल्या गाडीतूनही उतरले नाही. यामुळे पालकमंत्र्यांप्रती तीव्र नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
पालकमंत्र्यांच्या वतीने कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे नेते प्रकाश गेडाम यांनाही आविसं कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावले. जवळजवळ १५ मिनीट हा वाहनाचा ताफा कारसपल्ली येथे थांबून राहिला.
यावेळी पालकमंत्र्यांनी निवेदन घेण्याकरिता गाडीतून उतरण्याचे सौजन्य न दाखविल्याने आविसंचे शेकडो कार्यकर्ते संतप्त झालेत. पालकमंत्री व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात नारेबाजीही करण्यात आली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
यावेळी आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, रवी बोगोंनी, नगराम, कंगाली, अशोक इंगीली, अशोक हरी, लक्ष्मण बोल्लो, ग्रा. पं. उपसरपंच सडवली कुम्मरी, वासु सपाट, सडवली जनगाम, रामु इंगीली, रामु अंबाला, व्यंकटीस्वामी, डॉ. श्रीनिवास गौयकोटी आदी उपस्थित होते.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांचे निराकरण करण्याबाबत शासन व पालकमंत्री यांच्याकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे. या समस्यांची सोडवणूक न झाल्यास आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून उपोषण, आंदोलन व मोर्चाही काढला जाईल, अशी माहिती आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी यावेळी दिली. (तालुका प्रतिनिधी)