शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

साग, बिजा वृक्षाची अवैध तोड

By admin | Updated: October 5, 2014 23:04 IST

येथून जवळच असलेल्या अंतरंजी आणि पाथरगोटा गावातील मौल्यवान साग, बिजा झाडांची अवैध वृक्षतोड करण्यात आली. तोड केल्यानंतर २० ते २५ घनमीटरचे लाकडे गोळा करून ठेवण्यात आले आहे.

जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या अंतरंजी आणि पाथरगोटा गावातील मौल्यवान साग, बिजा झाडांची अवैध वृक्षतोड करण्यात आली. तोड केल्यानंतर २० ते २५ घनमीटरचे लाकडे गोळा करून ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यापासून गोळा केलेल्या या लाकडी मालास वाहतूक आदेशाची प्रतिक्षा असल्याचे समजते.अंतरंजी आणि पाथरगोटा येथील काही शेतकऱ्यांच्या खसऱ्यावरील सागवान प्रजातीचे सरासरी १२ घनमीटर आणि बिजा प्रजातीचे १० घनमीटर लाकडे दोन्ही ठिकाणी जमा करून तसेच ठेवण्यात आले आहेत. सदर प्रत्येक लठ्ठ्यावर योग्य प्रकारे क्रमांक ठाकण्यात आले नसून हॅमर मारल्याचे निशान आढळून येत नाही. उपवनसंरक्षक वडसा यांनी सदर मालाची कोणत्याही प्रकारची शहानिशा केली नसतांनाही या लाकडी मालाला खुंटाजवळून हलविण्यात आले. वास्तविक उपवनसंरक्षकांच्या परवानगीशिवाय तोडलेल्या वृक्षांची लाकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येत नाही, असा नियम आहे. मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून वृक्षांची लाकडे दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याने सदर उच्च मौल्यवान प्रजातीचा लाकडी माल खासगी क्षेत्रातील आहे की, सरकारी क्षेत्रातील आहे, हे कळायला मार्ग नाही. वनअधिनियम १९६७ नुसार सरकारी वाटपातील पट्टेदार जमिनीतील १९६७ पूर्वीच्या खसऱ्यावरील झाडांवर शेतकऱ्यांचा मालकी हक्क आहे. मात्र त्यानंतरच्या झाडावर शासनाचे हक्क असल्याचे नमूद आहे. शेतकऱ्याला वृक्षतोडीसाठी परवानगी घ्यावी लागते. २५ टक्के कराचा भरणा करून झाडाची खरेदी केली जाते. मात्र वनाधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे अवैध वृक्षतोड सुरू आहे. (वार्ताहर)