शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार निर्मितीत ग्रामसभेचा पुढाकार

By admin | Updated: May 15, 2014 23:32 IST

वनविभागाच्यावतीने ई-निविदा लिलाव प्रक्रिया राबवून जिल्ह्यातील पाचही वनविभागातील तेंदू युनिटची विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात जिल्ह्यातील एकूण १६0 तेंदू युनिटपैकी

गडचिरोली : वनविभागाच्यावतीने ई-निविदा लिलाव प्रक्रिया राबवून जिल्ह्यातील पाचही वनविभागातील तेंदू युनिटची विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात जिल्ह्यातील एकूण १६0 तेंदू युनिटपैकी ११0 तेंदू युनिटची खरेदी कंत्राटदारांनी केली आहे. उर्वरित ५0 तेंदू युनिटची लिलाव प्रक्रियेदरम्यान ग्रामसभांनी पुढाकार घेऊन १४ तेंदू युनिट खरेदी केली असल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे.

ग्रामसभेनी खरेदी केलेल्या तेंदू युनिटमध्ये गडचिरोली वनविभागातील महावाडा, सावरगाव, आलापल्ली वनविभागातील रेगडी, वेगनूर, बोलेपल्ली, कोटेपल्ली, मट्टीगुड्डा, वेडमपल्ली, वडसा वनविभागातील वैरागड, भामरागड वनविभागातील एटापल्ली, गेदा आणि सिरोंचा वनविभागातील छल्लेवाडा, रेगुलवाही, असरअल्ली (अंकिसा) आदींचा समावेश आहे.

प्रलंबित तेंदू युनिटबाबत दुर्गम भागातून अनेक मजुरांनी ओरड निर्माण केली होती. याशिवाय त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींनी प्रलंबित तेंदू युनिट तत्काळ निकाली काढून रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली. असे असतानासुध्दा कंत्राटदार दुर्गम भागातील तेंदू युनिट खरेदी करण्यासाठी धजावत नव्हते. अखेर मजुरांच्या रोजगाराचा विचार करून १४ गावातील ग्रामसभांनी पुढाकार घेतला. प्रलंबित ५0 पैकी १४ तेंदू युनिटची खरेदी ग्रामसभांनी केली आहे. आता वनविभागाच्यावतीने लिलाव प्रक्रिया समाप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात ३६ तेंदू युनिट कायम राहिले असून या तेंदू युनिटच्या हद्दीत यंदा तेंदू संकलन होणार नसल्याची माहिती आहे.

सामुहिक मालकी हक्काच्या अधिकारानुसार ग्रामसभांनी तेंदू युनिट खरेदी केली आहे. तेंदू संकलनाबाबत ग्रामसभेचा आर्थिक व्यवहार प्रत्यक्ष वनविभागाशी होणार आहे. ग्रामसभांनी खरेदी केलेले तेंदू युनिटचे काम सुरू झाल्यामुळे तेंदूसंकलन करणार्‍या मजुरांना रोजगार मिळाला आहे. मजुरांचे जत्थे जिल्ह्यात दाखल झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)