शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायतींचे नामांतर

By admin | Updated: May 2, 2015 01:33 IST

तालुकास्तरावरील ग्राम पंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतरण करण्याला मंजुरी मिळताच चामोर्शी, आरमोरी व सिरोंचा ग्राम पंचायत ..

चामोर्शी/आरमोरी/सिरोंचा : तालुकास्तरावरील ग्राम पंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतरण करण्याला मंजुरी मिळताच चामोर्शी, आरमोरी व सिरोंचा ग्राम पंचायत प्रशासनाने इमारतीवरील ग्राम पंचायतीच्या ऐवजी नगर पंचायत असे नामांतरण केले आहे.
एक वर्षापूर्वी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यात तालुकास्तरावर नगर पंचायती स्थापन करण्यात येत होत्या. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायती स्थापन करण्याबाबत शासनाने ग्राम पंचायत निवडणुकीपर्यंत ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे नगर पंचायत स्थापन होणार की नाही याबद्दल शंका, कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. अशातच ग्राम पंचायत निवडणुकीच्या अगदी आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत नगर पंचायत स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या निवडणुका ऐन वेळेवर रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली. त्याचवेळी नगर पंचायत स्थापन झाल्याचा आनंदही नागरिकांना होत होता. नगर पंचायतीला शासन जास्तीचे अनुदान देणार असल्याने या शहरांचा विकास होण्यास फार मोठी मदत होणार आहे.
२३ एप्रिल रोजी नगर पंचायतीला मंजुरी मिळाल्यानंतर ग्राम पंचायत प्रशासनाने सर्वप्रथम ग्राम पंचायतीच्या इमारतीवर लिहिलेले नाव बदलविण्याची प्रक्रिया सुरू केली. याअंतर्गत चामोर्शी, आरमोरी व सिरोंचा येथील इमारतींवर आता नगर पंचायत असे नाव लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर नगर पंचायतीची स्थापना २०१५ रोजी करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर ग्राम विकास अधिकाऱ्यांना हटवून तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. याच तहसीलदारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नगर पंचायतीचे प्रथम ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. चामोर्शी नगर पंचायतीत तहसीलदार वैद्य यांनी ध्वजारोहण केले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते. (लोकमत न्युज नेटवर्क)