शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. नामांकन आॅनलाईन प्रक्रियेतून सूट द्या

By admin | Updated: March 14, 2015 00:20 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशिल भागातील ग्रामपंचायत निवडणुकीकरिता मागील तीन ते चार वर्षांपासून उमेदवारी अर्जच दाखल होत नाही.

दिलीप दहेलकर गडचिरोलीनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशिल भागातील ग्रामपंचायत निवडणुकीकरिता मागील तीन ते चार वर्षांपासून उमेदवारी अर्जच दाखल होत नाही. त्यात आता राज्य निवडणूक आयोगाने आॅनलाईन नामांकन पत्र दाखल करून घेण्याचे निर्देश निवडणूक विभागाला दिले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आॅनलाईन नामांकन अर्ज प्रक्रियेतून गडचिरोली जिल्ह्याला सूट देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला असल्याची माहिती मिळाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात आगामी एप्रिल महिन्यात सार्वत्रिक ३४० व ८३ ग्रा.पं.च्या पोटनिवडणुका घेण्यासंदर्भात प्रशासनाचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे. मुदत भरणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया यावेळी राज्यातील इतर भागाप्रमाणेच गडचिरोली जिल्ह्यातही आॅनलाईन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात ७२० गावांमध्ये नेटवर्क नाही. शिवाय नक्षलग्रस्त व संवेदनशिल गावात माओवाद्यांच्या दहशतीमुळे नामांकन पत्र भरण्यासाठी अनेकदा नागरिक पुढे येत नाही. प्रशासनाला नागरिकांना सर्व बाबी समजावून देऊन त्यांच्या बैठका घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थिती आॅनलाईन नामांकन प्रक्रिया गाव तसेच तालुकास्तरावर राबविल्यास उमेदवारी अर्ज येण्यास अडचणी येऊ शकतात. ही बाब प्रशासनाला अवगत आहे. त्यामुळे या प्रक्रियेतून सूट दिली जावी, असा प्रस्ताव जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे ठेवला आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हीटी पाहून आॅनलाईन नामांकन भरून घ्यायचे की, पूर्वीची पध्दत अमलात आणायची याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी लोकमतला दिली आहे.जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, कोरची या अतिदुर्गम तालुकास्थळी इंटरनेट कनेक्टिव्हीटी राहत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आॅनलाईन नामांकन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून सूट देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे.