शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठाला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 19:22 IST

चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या वनसंपदेतून लोकांचा विकास करण्यासाठी विद्यापीठातून प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी या विद्यापीठाला शासनाकडून विशेष दर्जा प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांनी दिली.

ठळक मुद्दे कुलगुरूंची पत्रपरिषदेत माहितीगोडवाना विद्यापीठाला ‘१२-बी’ चा दर्जा मिळाल्याने विकासाचा मार्ग झाला मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) ‘१२-बी’ चा दर्जा मिळाल्याने विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हे विद्यापीठ आदिवासीबहुल व वनव्याप्त क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या वनसंपदेतून लोकांचा विकास करण्यासाठी विद्यापीठातून प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी या विद्यापीठाला शासनाकडून विशेष दर्जा प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांनी दिली.१२-बी चा दर्जा मिळाल्यानंतर डॉ.वरखेडी यांनी गुरूवारी पत्र परिषद घेतली. यावेळी कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, अधिष्ठाता डॉ.सुरेश रैवतकर, डॉ.श्रीराम कावळे आदी उपस्थित होते.

गोंडवाना विद्यापीठाला यूजीसीकडून १२-बी चा दर्जा मिळाल्यामुळे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना अनुदान प्राप्त होणार आहे. विविध भौतिक सुविधा व इतर नवीन विकास कामे करण्यासाठी यूजीसीकडून निधी उपलब्ध होणार आहे, असे डॉ.वरखेडी यांनी सांगितले. सकारात्मक दृष्टिकोनातून सामूहिक प्रयत्नाने या विद्यापीठाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आदिवासीबहुल भागात हे विद्यापीठ असल्याने आदिवासींची भाषा, परंपरा, संस्कृती व येथील वनातून रोजगार निर्मितीसाठी विद्यापीठाच्या वतीने उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल. त्याअनुषंगाने या विद्यापीठाला शासनाकडून विशेष दर्जा मिळणे गरजेचे आहे.एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबईला महिला विद्यापीठ म्हणून विशेष दर्जा देण्यात आला. याच धर्तीवर गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाला आदिवासीबहुल व वनव्याप्त क्षेत्र या मुद्यावर विशेष दर्जा शासनाकडून मिळावा, यासाठी आपला प्रयत्न राहणार असून लवकरच यासंदर्भातील परिपूर्ण प्रस्ताव विद्यापीठाच्या वतीने शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी सांगितले.

३० महाविद्यालये अनुदानासाठी पात्रगोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यातील एकूण ३० महाविद्यालयाचे अकॅडमीक ऑडीट झाले असून यातील सात कॉलेज १२-बी च्या अनुदानासाठी पात्र झाले आहे. सर्वच ३० ही कॉलेज ‘अ’ श्रेणीमध्ये आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांना १२-बी अंतर्गत शासनाचे अनुदान मिळणार आहे, अशी माहिती प्रभारी कुलगुरू डॉ.वरखेडी यांनी दिली. विद्यापीठ कॅम्पसमध्ये विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासोबतच विकास कामाला गती देऊन या विद्यापीठाचा नावलौकीक करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र