शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत मेडिकल कॉलेज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

शिवसेना शहर शाखा गडचिरोलीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना नागपूर येथे भेटून बुधवारी निवेदन देण्यात आले. शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू कावळे व गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंत्रीमहोदयांची भेट घेतली. यावेळी नवनाथ उके, गजानन नैताम, दिलेश सुरकार, वेदांत कापकर, संजय आकरे, चेतन कंदुकवार आदी पदाधिकाऱ्यांसह गडचिरोलीत शिवसैनिक हजर होते.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटले मंत्र्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात शासकीय रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी त्याची संख्या कमी आहे. परिणामी दुर्गम भागातील अनेक नागरिकांना मोठ्या आजारावरील औषधोपचार वेळेवर मिळत नाही. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व सेवा बळकट करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.यासंदर्भात शिवसेना शहर शाखा गडचिरोलीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना नागपूर येथे भेटून बुधवारी निवेदन देण्यात आले. शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू कावळे व गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंत्रीमहोदयांची भेट घेतली. यावेळी नवनाथ उके, गजानन नैताम, दिलेश सुरकार, वेदांत कापकर, संजय आकरे, चेतन कंदुकवार आदी पदाधिकाऱ्यांसह गडचिरोलीत शिवसैनिक हजर होते.निवेदनात म्हटले आहे की, वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचा प्रश्न प्रलंबित असून तो लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा. या रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात येणार आहे त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा. गडचिरोली येथील एमआयडीसी परिसरात वाढीव प्रकल्पासाठी जागा देण्यात यावी. चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोह उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले आहे. मात्र उद्योग निर्मितीबाबत काम सुरू करण्यात आले नाही. बेरोजगारी कमी करण्यासाठी उद्योग उभारण्याची कार्यवाही करावी तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे द्यावे, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयShiv Senaशिवसेना