गेदाचा पशुवैद्यकीय दवाखाना दोन महिन्यांपासून कुलूपबंद

By Admin | Updated: July 23, 2015 01:18 IST2015-07-23T01:18:55+5:302015-07-23T01:18:55+5:30

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत गेदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या दोन महिन्यांपासून कुलूपबंद असल्याची बाब उजेडात आली आहे.

GEDA veterinary dispenser locked for two months | गेदाचा पशुवैद्यकीय दवाखाना दोन महिन्यांपासून कुलूपबंद

गेदाचा पशुवैद्यकीय दवाखाना दोन महिन्यांपासून कुलूपबंद

पशुपालकांची अडचण : जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष
एटापल्ली : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत गेदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या दोन महिन्यांपासून कुलूपबंद असल्याची बाब उजेडात आली आहे. परिणामी गेदा भागातील शेतकरी व पशुपालकांना आपल्या आजारी जनावरांवर औषधोपचार करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात गेदाचे सरपंच हरिश पदा व गावकऱ्यांनी पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रार केली आहे. गेदा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेले कस्तुरे यांची बदली दोन महिन्यापूर्वी बदली करण्यात आली. तेव्हापासून सदर पशुवैद्यकीय दवाखाना कुलूपबंद अवस्थेत असल्याचे सरपंच हरिश पदा यांनी पंचायत समितीकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पावसाळ्याच्या दिवसात जनावरांना घटसर्प व इतर साथीच्या रोगाची लागण होण्याची दाट शक्यता असते. तसेच गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून घोट परिसरात घटसर्प रोगाने जवळपास ७० जनावरांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत गेदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना कुलूपबंद आहे. गेदा ग्राम पंचायतीअंतर्गत २० गावातील पशुवैद्यकीय सेवेचा भार गेदाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यावर आहे.
गेदाचा पशुवैद्यकीय दवाखाना प्रशासनाने तत्काळ सुरू करावा, अशी मागणी सरपंच हरिश पदा यांच्यासह उपसरपंच केशव कुळयेटी, ग्राम पंचायत सदस्य रमेश वैरागडे तसेच गुरूदास वैरागडे, शंकू भांडेकर, मधुकर पदा, किशोर सोमनकर, अविनाश सुरजागडे, वसंत भांडेकर, दीपक भांडेकर आदी ग्रामस्थांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: GEDA veterinary dispenser locked for two months