सर्वधर्मीय समाजाचा स्नेहमिलन साेहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST2021-02-07T04:33:59+5:302021-02-07T04:33:59+5:30

गडचिराेली : येथील मानवता पथ केंद्रात सर्वधर्मीय समाजातील महिलांचा हळदी-कुंकू व समाजप्रबाेधन कार्यक्रम बुधवारी पार पडला. उद्घाटन दादाजी मसराम ...

The gathering of the multi-religious community is in full swing | सर्वधर्मीय समाजाचा स्नेहमिलन साेहळा उत्साहात

सर्वधर्मीय समाजाचा स्नेहमिलन साेहळा उत्साहात

गडचिराेली : येथील मानवता पथ केंद्रात सर्वधर्मीय समाजातील महिलांचा हळदी-कुंकू व समाजप्रबाेधन कार्यक्रम बुधवारी पार पडला. उद्घाटन दादाजी मसराम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जि. प. समाजकल्याण सभापती मीना काेडापे हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका रंजना गेडाम, ॲड. शिल्पा मरस्काेल्हे, रेखा डाेळस, सुरेश खेवले, मधुकर मंचार्लावार, मधुर हेमके उपस्थित हाेते. सामाजिक कार्यक्रमातून स्नेह व सामाजिक बांधिलकी निर्माण हाेते, असे प्रतिपादन दादाजी मेश्राम यांनी केले. दरम्यान उपस्थितांनी ही मनाेगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी मंगला खेवले, दीक्षा काेडाप, पल्लवी बारापात्रे, नूतन शर्मा, ममता मेश्राम, प्रियंका नान्हे, लीला बागडे, सुषमा विश्वास, शारदा ढाेरे, वीणा धात्रक, माेहिनी मेश्राम, कविता साळवे, सरिता चिचघरे, पूजा आत्राम, मंगला काेंडावार, स्नेहा खेवले, कुंदा काेलते यांनी सहकार्य केले.

Web Title: The gathering of the multi-religious community is in full swing