शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीचा दरवाजा तोडून चोरी करणाऱ्यांच्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

९ डिसेंबरच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गव्हाची पोती घेऊन ओडिशाकडून आलेली रेल्वेची मालगाडी गोंदियावरून धर्मापुरीकडे जाण्यासाठी वडसा रेल्वेस्थानकाकडे येत होती; पण सिग्नल न मिळाल्यामुळे ती मालगाडी ३६ मिनिटे अर्जुनी मोरगाव रेल्वेस्थानकाबाहेर उभी होती. याचदरम्यान अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मालगाडीचा दरवाजा उघडून त्यातील जवळपास ३० पोती गहू पळविला. 

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गव्हाची पोती घेऊन दक्षिणेकडील धर्मापुरी येथे जात असलेल्या मालगाडीचा दरवाजा उघडून जवळपास ३० पोती गहू लांबविणाऱ्या ९ आरोपींच्या टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेली गव्हाची पाेतीही जप्त करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, ९ डिसेंबरच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गव्हाची पोती घेऊन ओडिशाकडून आलेली रेल्वेची मालगाडी गोंदियावरून धर्मापुरीकडे जाण्यासाठी वडसा रेल्वेस्थानकाकडे येत होती; पण सिग्नल न मिळाल्यामुळे ती मालगाडी ३६ मिनिटे अर्जुनी मोरगाव रेल्वेस्थानकाबाहेर उभी होती. याचदरम्यान अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मालगाडीचा दरवाजा उघडून त्यातील जवळपास ३० पोती गहू पळविला. वडसा रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाली करून सर्व आरोपींना अर्जुनी माेरगाव येथून अटक करून रेल्वे सुरक्षा पोलिसांच्या नागभिड ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चुघ, सहायक सुरक्षा आयुक्त एस.डी. देशपांडे, निरीक्षक पी.सी. शर्मा यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विजय भालेकर, आरक्षक एन. बी. सुखदेवे, एल.जी. प्रसाद, विनयकुमार गौड आदींनी केली.

 

टॅग्स :railwayरेल्वेThiefचोर