शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

मापिसा कायद्याविरोधात काँग्रेसचे गडचिरोलीत निदर्शने

By admin | Updated: September 1, 2016 01:41 IST

राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या नवीन महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरनल सेक्युरिटी अ‍ॅक्ट २०१६ (मापिसा) या कायद्याचा विरोध

राज्य सरकारचा केला निषेध : शेकडो कार्यकर्ते रस्त्यावरगडचिरोली : राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या नवीन महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरनल सेक्युरिटी अ‍ॅक्ट २०१६ (मापिसा) या कायद्याचा विरोध करण्यासाठी बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गडचिरोलीत जोरदार निदर्शने करुन राज्य सरकारचा निषेध केला.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. ‘मापिसा’ कायदा हा केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तसेच शासनाच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध होत असलेल्या जनआंदोलनावर अंकूश ठेवून हुकुमशाही प्रस्थापित करण्यासाठी असल्याचा आरोप माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी यावेळी केला. या कायद्यामुळे शंभर किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येऊन कार्यक्रम घ्यावयाचा असल्यास पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच सुरक्षिततेची जबाबदारी आयोजकांवर राहील. ही बाब लक्षात घेता लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, वाढदिवस यासारख्या घरगुती कार्यक्रमांवरही बंधने येणार आहेत. शिवाय पोलिसांवर टीका करता येणार नाही आणि कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची झडती घेण्याचे अधिकार पोलिसांना राहतील. तसेच पोलिसांनी केलेल्या चुकीच्या कारवाईविरुद्ध न्यायालयात दादही मागता येणार नाही. या कायद्याचे उल्लंघन केल्यास कारावासाची शिक्षा होऊ शकते. एकंदरित हा कायदा जुलमी व गोरगरीब नागरिकांचा आवाज दडपण्यासाठी लागू केला जात असून, काँग्रेस पक्ष तो लागू करु देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिला. या आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी पंकज गुड्डेवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, जिल्हा सचिव प्रभाकर वासेकर, रोजगार सेलचे अध्यक्ष काशिनाथ भडके, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, जिल्हा सचिव एजाज शेख, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनिकांत मोटघरे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष नंदू वाईलकर, एनएसयूआयचे अध्यक्ष नीतेश राठोड, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, सी.बी.आवळे, पुरुषोत्तम मसराम, रामचंद्र गोटा, पं. स. सदस्य अमिता मडावी, सुभाष धाईत, बाशिद शेख, दिलिप घोडाम, उमेश कुळमेथे, कुणाल पेंदोरकर, बाळू मडावी, मिलिंद बागेसर, आरिफ कनोजे, कमलेश खोब्रागडे, नितीन पिपरे, बंटी राठोड, राकेश रत्नावार, हिरानंद शेळके, राकेश गणवीर, दादाजी मेश्राम, नगरसेविका पुष्पा कुमरे, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, दर्शना मेश्राम, दर्शना लोणारे, आरती कंगाले, निशा गेडाम, रेखा खोब्रागडे, विजय भांडेकर, हेमंत भांडेकर, शोभा वाळके, संगीता सोनुले, मीरा निंदेकर, गीता पित्तुलवार, ज्योती गव्हाणे, वर्षा गुलदेवकर, दिवाकर निसार, भूषण भैसारे, मिलिंद किरंगे, लोकेश राऊत आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)