ओबीसी माेर्चाला माजी मंत्री बावनकुळे व केदार उपस्थित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST2021-02-11T04:38:18+5:302021-02-11T04:38:18+5:30

गडचिराेली : २२ फेब्रुवारी राेजी गडचिराेली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चाचे आयाेजन करण्यात आले आहे. या माेर्चाला माजी ऊर्जामंत्री ...

Former ministers Bavankule and Kedar will be present at the OBC march | ओबीसी माेर्चाला माजी मंत्री बावनकुळे व केदार उपस्थित राहणार

ओबीसी माेर्चाला माजी मंत्री बावनकुळे व केदार उपस्थित राहणार

गडचिराेली : २२ फेब्रुवारी राेजी गडचिराेली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चाचे आयाेजन करण्यात आले आहे. या माेर्चाला माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी क्रीडामंत्री सुनील केदार यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या माेर्चात स्वत: सहभागी हाेण्याचे आश्वासन दाेन्ही माजी मंत्र्यांनी दिले आहे.

राज्याचे माजी क्रीडामंत्री सुनील केदार यांची गडचिराेली जिल्हा ओबीसी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागपुरात भेट घेतली. यावेळी प्राचार्य डाॅ.बबनराव तायवाडे, युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे उपस्थित हाेते. माजी मंत्री केदार आणि बावनकुळे यांनी उपस्थित राहून माेर्चाचे नेतृत्व करण्याचे आश्वासन दिल्याने माेर्चाची ताकद पुन्हा वाढली आहे.

----

दुर्गा व मुक्तेश्वर काटवे यांचा पाठिंबा

जिल्ह्यात ओबीसींची संख्या बहुसंख्य असतानाही शासन ओबीसींना सापत्न वागणूक देत आहे. पुरेसा निधी दिला जात नसल्याने विकास रखडला आहे. माेर्चाच्या माध्यमातून ताकद दाखविण्याची संधी ओबीसी समाजाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे या माेर्चात बहुसंख्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे व भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष दुर्गा काटवे यांनी केले आहे.

Web Title: Former ministers Bavankule and Kedar will be present at the OBC march