शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनीचे रूपांतर होतेय शेतजमिनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

आलापल्ली वनविभागाअंतर्गत पेरमिली वनपरिक्षेत्राच्या हद्दीत बुर्गी गाव येते. या गावालगत रस्त्याच्या बाजूला वनजमिनीवरील झाडे तोडून भरदिवसा ट्रॅक्टरच्या सहाय्याने सपाटीकरण करून अतिक्रमण केले जात आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष हा प्रकार पाहिल्यानंतर जेसीबीचालक जेसीबी घेऊन पसार झाला.

ठळक मुद्देभरदिवसा जेसीबी व ट्रॅक्टरने सपाटीकरण : मुख्य मार्गालगत वाढले अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : वनविभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे एटापल्ली तालुक्यातील वनजमिनीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. बुर्गी गावाजवळ उडेरा-बुर्गी मार्गालगत जंगलातील झाडे तोडून तेथे शेतजमिनीसाठी सपाटीकरण केले जात आहे. अवैधरित्या सुरू असलेल्या या अतिक्रमणाबाबत मात्र वनकर्मचारी अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.आलापल्ली वनविभागाअंतर्गत पेरमिली वनपरिक्षेत्राच्या हद्दीत बुर्गी गाव येते. या गावालगत रस्त्याच्या बाजूला वनजमिनीवरील झाडे तोडून भरदिवसा ट्रॅक्टरच्या सहाय्याने सपाटीकरण करून अतिक्रमण केले जात आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष हा प्रकार पाहिल्यानंतर जेसीबीचालक जेसीबी घेऊन पसार झाला. सदर अतिक्रमणाबाबतची माहिती प्रस्तूत प्रतिनिधीने या क्षेत्राचे वनपाल व वनरक्षकांना दिली असता, याबाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही, असे त्या वनकर्मचाऱ्याने सांगितले.एटापल्ली तालुक्यात दरवर्षी शेकडो हेक्टर वनजमिनीवरील झाडे सर्रास तोडून त्यावर शेतजमीन तयार केली जाते. काही नागरिक घराचे बांधकाम करतात. अशा प्रकारे अवैध अतिक्रमण वाढत असल्याने वनजमिनीचे व जंगलाचे क्षेत्र कमी होत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :forestजंगलagricultureशेती