शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांच्या सूचनांचे हाेते पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कार्यकर्त्यांच्या भरवशावर चालणारा पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्त्यांच्या सूचनांचे पालन केले जाते, ...

अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कार्यकर्त्यांच्या भरवशावर चालणारा पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्त्यांच्या सूचनांचे पालन केले जाते, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यात ‘परिवार संवाद’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ गुरुवारी अहेरी येथे करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्याध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार धर्मरावबाबा अत्राम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री अत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम, प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, रवींद्र सामला, आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे मोठा झाला आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांशी संवाद साधायला अहेरी येथे आलाे आहाेत. धर्मरावबाबा अत्राम यांना दिल्ली येथे पाठवायचे आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे. अहेरी उपविभागातील रखडलेले सर्व सिंचन प्रकल्प येत्या दोन वर्षांत कार्यान्वित केले जातील, असे आश्वासन पाटील यांनी दिले.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली. हा लोकशाहीचा विजय आहे. गडचिरोली जिल्ह्यात लवकरच मोठी पोलीस भरती घेऊन जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देशमुख म्हणाले. सुरजागड प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी आ. धर्मरावबाबा अत्राम यांनी गृहमंत्र्यांकडे केली. यावेळी शेकडो कार्यकर्ते व ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांनीं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुरेंद्र अलोणे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.