शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सक्षमीकरणावर भर

By admin | Updated: September 9, 2014 23:29 IST

पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ महिलांना स्वयंसहाय्यता गटामार्फत दिला जाईल. त्याबरोबरच जीवनोन्नती अभियानाच्या भविष्यकालीन योजनांच्या माध्यमातून महिलांच्या

अहेरी : पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ महिलांना स्वयंसहाय्यता गटामार्फत दिला जाईल. त्याबरोबरच जीवनोन्नती अभियानाच्या भविष्यकालीन योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन संवर्ग विकास अधिकारी चांदेकर यांनी केले.जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान कक्षातर्फे रविवारी आलापल्ली वनविभागाच्या सभागृहात पार पडलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी १७० महिलांनी शिधापत्रिका, आधारकार्ड तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरीता नाव नोंदणी करून घेतली. महिला मेळाव्याला कृषी विस्तार अधिकारी फुलझेले, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक राम पवार, सामाजि कार्यकर्त्या सुशिला भगत उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी केले. त्यांनी जीवनोन्नती अभियानाबाबत ग्रामीण भागात असलेली गरज स्पष्टपणे नमूद केली. कृषी विस्तार अधिकारी फुलझेले यांनी अभियान व कृषी योजनांची सांगड घालण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य महिलांना केले जाईल, असे प्रतिपादन केले. त्याबरोबरच विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. जीवनोन्नती अभियानामुळे महिलांमधील आत्मविश्वास वाढला आहे. अनेक महिलांमध्ये याविषयी जाणीव जागृती होत आहे. या अभियानामुळे अनेक कामाची प्रभाविपणे अंमलबजावणी होत असल्याचे प्रतिपादन सुशीला भगत यांनी केले. महिला सक्षमीकरण या विषयावर जिल्हा व्यवस्थापक राम पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध योजनांची माहिती उपस्थित मान्यवरांनी महिलांना दिली. कार्यक्रमाचे संचालन शांता खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण डोंगरे, गंगाधर डोर्लीकर, राकेश दुर्गे, मंदा तोफा, रजनी गड्डम, एकता उमरे, मंजू डोंगरे, सुनीता उराडे, विनोद बोबाटे यांच्यासह अनेक महिलांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)