शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीसाठी पाच कोटींचा निधी देणार

By admin | Updated: August 17, 2016 01:37 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी ...

सामाजिक न्यायमंत्र्यांचे आश्वासन : देसाईगंज नगर परिषदेतर्फे गुणवंताचा सत्कार देसाईगंज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी सुमारे पाच कोटी रूपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देऊन विकासकामांना सुरूवात केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र समोर ठेवूनच शहराचा विकास होत असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. देसाईगंज शहरात कोट्यवधी रूपयांचे विकासकामे करण्यात आली आहेत. या विकासकामांचे लोकार्पण नामदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते १६ आॅगस्ट रोजी करण्यात आले. यानिमित्त नगर परिषदेच्या सांस्कृतिक भवनात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा. अनिल सोले, आमदार क्रिष्णा गजबे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, पंचायत समिती सभापती प्रिती शंभरकर, नगराध्यक्ष शाम उईके, न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, मुरलीधर सुंदरकर, नाना नाकाडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू जेठानी, भामानी, नगर परिषद मुख्याधिकारी तैमूर मुलानी, आबीदअली सय्यद, विकास साळवे, मनोज खोब्रागडे, शालू दंडवते, आशा राऊत, सुनिता ठेंगरी, करूणा गणवीर, निलोफर शेख, शोभा पत्रे, विजया सरदारे, भाविका तलमले, शरद मुळे, कल्पना माडावार, डॉ. महेश पापडकर आदी मान्यवर उपस्थित होत. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाजपा सरकार सर्वसामान्य जनतेला समोर ठेवून योजना आखत आहे. याच योजना गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या वेळी आखल्या असत्या तर आपल्या जिल्ह्याचा विकास कधीच झाला असता, भाजपाचे सरकार येऊन केवळ दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. या काळात देसाईगंज नगर परिषदेला राज्य सरकारने कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. येणाऱ्या तीन वर्षात देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प राहिल, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. (वार्ताहर)