शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमोपचार पेट्या गायब

By admin | Updated: October 27, 2014 22:36 IST

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे, प्रथमोपचार पेटी व क्वाईन बॉक्स काही दिवसांपूर्वी बसविण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत

गडचिरोली : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे, प्रथमोपचार पेटी व क्वाईन बॉक्स काही दिवसांपूर्वी बसविण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत बहुतांश एसटीमधून सदर उपकरणे दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे आकस्मिक संकटाच्या वेळी मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक बसमधील आग प्रतिबंधक उपकरणे, प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत.आग प्रतिबंधक उपकरणे बसविणे हे परिवहन कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून संबंधीत कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. एसटी महामंडळाने सुरक्षित प्रवासाची जणू हमीच घेतली, अशा आविर्भावात प्रवाशांच्या सुरक्षेचा उदो उदो प्रारंभी केला जात होता. मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान व उदासीन कारभारामुळे प्रवाशांची असुरक्षितता वाढली आहे. परिणामत: अनेक प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळले आहेत. दुर्दैवाने बसमधून प्रवास करतांना अपघात झालाच तर प्राथमिक उपचार म्हणून कशाचा वापर करायचा असा प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण झाला आहे. अपघात प्रवाशी किरकोळ जखमी झाल्यावर जागीच प्राथमिक उपचार व्हावा, याकरिता डेटॉल, ड्रेसिंग आदी साहित्य असलेली पेटी बसगाडीत पूर्वी असायची. याबाबत परिवहन विभागाकडून राज्यातील सर्व आगारांना स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात चालणाऱ्या कोणत्याही एसटी बसमध्ये प्रथमोपचार पेटी तर दिसतच नाही. शिवाय आग प्रतिबंधक यंत्रणाही गायब झाल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली आगारातून सिरोंचा, भामरागड, कोरची, धानोरा यासारख्या दुर्गम भागात अनेक बसफेऱ्या होतात. या बसगाड्या जिल्ह्यात व जिल्हाबाहेरही प्रवाशांची ने-आण करतात. गडचिरोली आगारातील एसटी गाड्यांच्या देखभालीसाठी एक मुख्य वर्कशॉप आहे. एसटीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटीचे विभागीय कार्यलय आहे. सुरक्षित प्रवास म्हणून प्रवाशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला प्रथम पसंती देतात. प्रवाशांच्या सोयीनुसान नवनवीन गाड्या आणल्या जातात. प्रवासाला जाणाऱ्या प्रत्येक गाडीची पाहणी केली जाते. अशावेळी गाडीत प्रथमोपचार, अग्नीशमन यंत्रणा व त्यातील साहित्य आहेत की नाही याची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांकडून का होत नाही, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. बहुतांश एसटीतील क्वाईन बॉक्सही बेपत्ता झाले आहेत. आग प्रतिबंधक उपकरणे अनेक बसमध्ये लावण्यातही आले नव्हते. त्यामुळे सध्य:स्थितीतही अनेक बसेस साहित्यविनाच आहेत. विशेष सदर उपकरणे असल्याशिवाय आरटीओ कार्यालयाकडून वाहनांची पासिंग केली जात नाही. असे असताना वाहनांची पासिंग कशी काय केली जात आहे, हाही प्रश्न आहे. बसगाड्यांमधील प्रथमोपचार पेट्या व इतर साहित्य अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. (शहर प्रतिनिधी)