शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मुख्यालयाच्या दोन्ही शासकीय रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST

गडचिरोली : आगीसारखी दुर्घटना घडल्यास ती तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय इमारतीमध्ये फायर फायटिंग सिस्टीम असणे गरजेचे असते. त्यात इमारत ...

गडचिरोली : आगीसारखी दुर्घटना घडल्यास ती तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय इमारतीमध्ये फायर फायटिंग सिस्टीम असणे गरजेचे असते. त्यात इमारत मोठी असेल तर आग विझवण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन (होजरील सिस्टीम) आवश्यक आहे. पण जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा जिल्हा महिला व बाल रुग्णालय या दोन्ही महत्वाच्या रुग्णालयांमध्ये ही व्यवस्था नाही. त्यामुळे सदर दोन्ही इमारतींची अग्निशमन यंत्रणा नापास ठरली आहे. भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर शनिवारी करण्यात आलेल्या तातडीच्या फायर ऑडिटमध्ये ही बाब समोर आली.

भंडारा येथील रुग्णालयाच्या आगीत १० नवजात बाळांना जीव गमवावा लागला. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गडचिरोलीतील शासकीय रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा कितपत सक्षम आहे याची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला दिले. त्यानुसार अग्निशमन अधिकारी अनिल गोवर्धन यांनी दोन्ही रुग्णालयांची तपासणी केली. त्यात अग्निरोधक यंत्राशिवाय (फायर इस्टिंग्विशर) दुसरी कोणतीही अग्निरोधक यंत्रणा नसल्याचे आढळले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशस्त इमारतीत इतक्या वर्षातही ही सुविधा निर्माण करण्याकडे कोणी लक्ष दिले नाही.

४० लाखांचे काम गेले दोन कोटींवर

महिला-बाल रुग्णालय इमारतीच्या मूळ नकाशात फायर फायटिंग सिस्टीमचा समावेश होता. पण निधी कमी असल्याचे सांगत तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी ती सुविधा काढण्याची सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. त्यावेळी या सुविधेसाठी ४० ते ४५ लाखांचा खर्च आला असता. मात्र आता ती सुविधा निर्माण करण्यासाठी जवळपास दोन कोटींचा खर्च येणार आहे. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आता हा अतिरिक्त भुर्दंड पडणार आहे.

‘लोकमत’ने आधिच वेधले होते लक्ष

विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन होण्याआधीच या इमारतीत अग्निशमन यंत्रणा पुरेशी नसल्याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. पण निधी अपुरा असल्याचे कारण पुढे करत अग्निशमन यंत्रणा लावण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अशा स्थितीत भंडारासारखी दुर्घटना घडली असती तर त्यासाठी कोणाला जबाबदार धरले असते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळा इमारतींचेही होणार फायर ऑडिट

सर्व मोठ्या शासकीय इमारतींमध्ये फायर फायटिंग सिस्टीम असणे गरजेचे आहे. गडचिरोलीतील दोन्ही शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशी व्यवस्था नाही. फायर ऑडिटसाठी आज त्यांची तपासणी केली. त्यात कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे त्याचा अहवाल सोमवारी देणार आहे.

- अनिल गोवर्धन

अग्निशमन अधिकारी, न.प.गडचिरोली

----

महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीत सध्या ७४ अग्निशमन यंत्र आहेत. पण नियमानुसार सर्व व्यवस्था असावी यासाठी रुग्णकल्याण समितीच्या बैठकीत हा मुद्दा जिल्हा शल्य चिकित्सकांकडे वारंवार मांडला आहे. दिड वर्षापूर्वी त्यासाठी नागपूरच्या एका कंपनीकडून कोटेशनसुद्धा मागितले होते. त्यावेळी त्यासाठी दिड कोटीचा खर्च त्यांनी सांगितला होता. निधी मंजूर झाल्याशिवाय ही व्यवस्था करता येणार नाही.

- डॉ.डी.के.सोयाम, वैद्यकीय अधीक्षक, महिला-बाल रुग्णालय