शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अखेर न.प. शाळेची जीर्ण इमारत पाडली

By admin | Updated: September 9, 2014 23:28 IST

आरमोरी मार्गावरील नगरपरीषद शाळेची जीर्ण झालेली इमारत अखेर पाडण्यात आली़ पावसामुळे लगतच्या व्यापाऱ्यांना या इमारतीमुळे धोका निर्माण झाला होता़ इमारत पाडण्यासाठी

न.प. प्रशासनाची कारवाई : पावसामुळे भिंत कोसळून अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली होतीदेसाईगंज : आरमोरी मार्गावरील नगरपरीषद शाळेची जीर्ण झालेली इमारत अखेर पाडण्यात आली़ पावसामुळे लगतच्या व्यापाऱ्यांना या इमारतीमुळे धोका निर्माण झाला होता़ इमारत पाडण्यासाठी व्यापाऱ्यांनी कित्येक दिवसांपासून प्रयत्न चालविले होते़ मात्र इमारतीची एक भिंत पूर्णपणे पडल्यावर नगर पालिका प्रशासनाला नाईलाजाने जीर्ण झालेली इमारत पाडावी लागली़ शहरातील आरमोरी मार्गावर १९५३ पासून नगर पालिका प्रशासनाच्या शाळेची इमारत उभी आहे़ पूर्वीच्या काळी या इमारतीने शहरात वेगळी ओळख निर्माण केली होती़ पूर्वीच्या जिल्हा परिषद विभागाने ही इमारत बांधलेली होती़ नगर पालिका स्थापन झाल्यानंतर ही इमारत पालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात आली़ नगर पालिकाच्या दुर्लक्षामुळे ही इमारत मोडकडीस आली होती़ इमारतीच्या आजूबाजूला दाटीने लहान व्यापाऱ्यांची दुकाने आहेत़ इमारतीचा एक भाग पूर्णपणे पडलेला होता़ त्यामुळे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना धोका निर्माण झाला होता़ इमारत पाडण्याकरीता शेजारच्या व्यापाऱ्यांनी अनेकदा नगर पालिका प्रशासनाकडे अर्ज केले होते़ मात्र नगर पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते़ सतत येत असलेल्या पावसामुळे सोमवारी दुपारी इमारतीची दुसरीही भिंत पूर्णपणे जमिनदोस्त झाली़ जीर्ण झालेली इमारत पडण्याचा धोका अधिक गडद झाला़ या सबंधाने व्यापाऱ्यांनी लगेच नगर पालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली़ मात्र प्रत्यक्ष जागेवरचा धोका लक्षात न घेता नगर पालिका प्रशासन चालढकल करण्याचे उत्तरे देत होते. लगेच पोलीस निरीक्षक मांजरे यांना याबाबतची माहिती देण्यात आली़ पोलीस प्रशासनाने लगेच नगर पालिका प्रशासनाला बोलावून इमारत पाडण्याच्या सूचना केल्या़ मंगळवारी इमारत पाडण्याची कार्यवाही केली. (वार्ताहर)