शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बांधावर खत योजना वाध्यांत

By admin | Updated: July 24, 2014 23:50 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बांधावर खत योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत बांधावर बियाणे व खत पुरवविण्यासाठी वाहतूक खर्चाकरीता अनुदान देण्याचे नियोजन होते.

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बांधावर खत योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत बांधावर बियाणे व खत पुरवविण्यासाठी वाहतूक खर्चाकरीता अनुदान देण्याचे नियोजन होते. यासाठी जि.प.च्या मूळ अर्थसंकल्पात ३ लाख ५ हजार रूपयाची तरतूद होती. मात्र बुधवारी मंजूर करण्यात आलेल्या जि.प.च्या पुनर्विनियोजन अर्थसंकल्पात सदर निधी इतर योजनेत वळविण्यात आला. आता बांधावर खत योजनेसाठी केवळ ५ हजार रूपयाची तरतूद आहे. निधीची तरतूदच नसल्याने यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाची बांधावर खत योजना वाद्यांत येणार आहे. जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनी कडधान्य बियाणावर अनुदान देणे, शेतकऱ्यांना पीव्हीसी, एचडीपीई पाईप वाटप करणे, बागायती शेतकऱ्यांना तारांच्या कुंपनाकरीता अनुदान देणे, सुधारित कृषी अवजारे, पीक संरक्षण उपकरण, मळणी यंत्र, विद्युत, डिझेल, पेट्रोल, केरोसीन, पंपसंचाला अनुदान देणे आदी योजनांसाठी ५० हजार रूपयाची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी जि.प.चे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांच्याकडे १७ जुलै रोजी पत्रान्वये केली. मात्र जिल्हा परिषदेच्या मूळ अर्थसंकल्पात सदर वाढीव निधीची तरतूद न करता उलट या योजनेवरील निधी कमी केला. त्यामुळे जि.प.च्या कृषी विभागाला शेतकरी हिताच्या या योजना राबविणे अडचणीचे जाणार आहे. कृषी व सिंचन विभागाला विविध योजना राबविण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र नुकत्याच मंजूर झालेल्या मूळ अर्थसंकल्पात या दोन्ही विभागाच्या योजनांसाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली नाही. यामुळे कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला. शेतकरी विरोधी असलेल्या या अर्थसंकल्पाविषयी गण्यारपवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)