शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

वनालगत शेती कसणाऱ्यांना वाघांपासून धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यातील जंगलात जवळपास ३० वर्षांपूर्वी वाघांचा वावर हाेता. यामध्ये प्रामुख्याने देसाईगंज, कुरखेडा, गडचिराेली, धानाेरा आदी तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्ह्यातील जंगलात वाघ स्थायी हाेत नव्हते. हिवाळा व उन्हाळ्यात वास्तव्य केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात स्थलांतरित व्हायचे, परंतु गेल्या तीन वर्षांत वाघांचा वावर वाढला व ते स्थायी झाले. वडसा वनविभाग व गडचिराेली वनविभागातील धानाेरा तालुक्यातील चातगाव वनपरिक्षेत्रात वाघांचा वावर आहे.

ठळक मुद्देवनविभागाकडून इशारा : खरीप हंगामात हल्ले वाढण्याची शक्यता; अनेकांची शेती जंगलालगत

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : तालुक्यातील पाेर्ला वनपरिक्षेत्रात सर्वाधिक वाघांचा वावर आहे. तालुक्यातील बहुतांश शेती जंगलाला लागून असल्याने पावसाळ्यात शेती कसणाऱ्यांना वाघांपासून धाेका हाेण्याची शक्यता आहे. मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी पाेर्ला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातर्फे क्षेत्रातील ग्रामपंचायतींना पत्र पाठवून नागरिकांनी जंगलात जाऊ नये यासाठी दवंडीद्वारे सूचित करण्यास सांगितले आहे. तरीसुद्धा वनालगत शेती कसणारे शेतकरी जंगलाच्या परिसरातूनच जाणार आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सर्वाधिक धाेका आहे.गडचिराेली जिल्ह्यातील जंगलात जवळपास ३० वर्षांपूर्वी वाघांचा वावर हाेता. यामध्ये प्रामुख्याने देसाईगंज, कुरखेडा, गडचिराेली, धानाेरा आदी तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्ह्यातील जंगलात वाघ स्थायी हाेत नव्हते. हिवाळा व उन्हाळ्यात वास्तव्य केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात स्थलांतरित व्हायचे, परंतु गेल्या तीन वर्षांत वाघांचा वावर वाढला व ते स्थायी झाले. वडसा वनविभाग व गडचिराेली वनविभागातील धानाेरा तालुक्यातील चातगाव वनपरिक्षेत्रात वाघांचा वावर आहे. याशिवाय अहेरी, एटापल्ली तालुक्यातही वाघांचे दर्शन अनेकांना झाले आहे, परंतु गडचिराेली तालुक्यात वाघांची दहशत माेठ्या प्रमाणावर आहे.  ६ नाेव्हेंबर २०२० राेजी वाघाच्या हल्ल्यात राजगाटा चक येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही पहिली घटना हाेती.  तर १८ मे राेजी दिभना येथील महिलेला वाघाने   ठार केले, ही शेवटची घटना घडली.  पहिल्या हल्ल्यानंतर या वनक्षेत्रात वाघांचे मानवावरील हल्ले वाढतच राहिले. आतापर्यंत ८ महिन्याच्या कालावधीत गडचिराेली तालुक्यातील सहा महिला व २ पुरुषांचा मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाला आहे. यामध्ये राजगाटा चक, इंदिरानगर, गाेगाव, धुंडेशिवणी, अडपल्ली, महादवाडी, कुऱ्हाडी व राजगाटा माल येथील महिला व पुरुषांचा समावेश आहे. तर दिभना व कुऱ्हाडी येथील पुरुष व कळमटाेला चक येथील एक महिला वाघाच्या हल्ल्यापासून बचावल्या. त्यांना वाघाने केवळ जखमी केले. पाेर्ला वनपरिक्षेत्रातील जंगल जवळपास १५ ते २० किमी चारही दिशांनी व्याप्त आहे. याशिवाय जंगलात वन्यप्राणी बऱ्याच प्रमाणात आहेत. डाेंगरदऱ्या व लहान ओढे असल्याने पाणी व त्यांना शिकार करता येईल, अशी भाैगाेलिक स्थिती आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्रात वाघ स्थिरावले आहेत. तालुक्यातील बहुतांश गावातील शेती जंगलालगत आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामात शेती कसण्याकरिता जाणार आहेत. अशास्थितीत त्यांना वाघांपासून धाेका हाेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अस्वलींसह बिबट्यांचाही वावर पाेर्ला वनपरिक्षेत्रात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

ग्रामपंचायतींना पाठविले पत्रपाेर्ला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या वतीने पाेर्ला, चुरचुरा, सिर्सी, मरेगाव आदी क्षेत्रसहायक कार्यालयांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींना पत्र पाठवून नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी दवंडी देण्यास सूचित केले आहे. विशेष म्हणजे, चुरचुरा, महादवाडी, कुऱ्हाडी, अडपल्ली, गाेगाव, दिभना, राजगाटा, कळमटाेला, आंबेटाेला, आंबेशिवणी, देशपूर, कुरंझा, देलाेडा, धुंडेशिवणी मरेगाव, टेंभा, चांभार्डा, बाेथेडा, मुरमबाेडी आदी गावे जंगलाला लागून आहेत. सदर गावांच्या परिसरात वाघांचा वावर आहे. यापैकी पाेर्ला वनपरिक्षेत्रातील ग्रामपंचायतींना पत्र पाठविण्यात आले आहे.

 

टॅग्स :Tigerवाघagricultureशेती