शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडे ६० हजार क्विंटल कापूस अजूनही पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन येथे कापूस खरेदी दररोज सुरू ठेवावी, तसेच २० गाड्यांपेक्षा अधिक कापूस दररोज खरेदी करावा, अशी मागणी चामोर्शी पं.स.चे माजी उपसभापती अशोक तिवारी यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे. कापूस हे नगदी पीक असल्याने व भाव देखील धानाच्या तुलनेत खूप जास्त मिळत असल्याने चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली आहे.

ठळक मुद्देखरेदी प्रक्रियेत मंदगती : विक्रीसाठी १२०० जणांची नोंदणी

रत्नाकर बोमिडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : कोरोनाच्या संचारबंदीमुळे कापूस खरेदी बंद पडली. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन कापूस खरेदी पूर्ववत सुरू करण्यात आली. चामोर्शी तालुक्याच्या अनखोडा येथील एकमेव कापूस जिनिंग फॅक्ट्रीमध्ये कापूस खरेदी-विक्रीची सुविधा निर्माण झाली. मात्र आतापर्यंत आठवड्यात दोनच दिवस आणि २० गाड्या इतकाच कापूस खरेदी केला जात असल्याने तालुक्यासह परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या घरी ६० हजार क्विंटल कापूस विक्रीअभावी पडून आहे.शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन येथे कापूस खरेदी दररोज सुरू ठेवावी, तसेच २० गाड्यांपेक्षा अधिक कापूस दररोज खरेदी करावा, अशी मागणी चामोर्शी पं.स.चे माजी उपसभापती अशोक तिवारी यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे. कापूस हे नगदी पीक असल्याने व भाव देखील धानाच्या तुलनेत खूप जास्त मिळत असल्याने चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली आहे. भविष्यात तालुक्यामध्ये कापसाचा पेरा वाढणारच आहे. आजपर्यंत चामोर्शी तालुक्यात एकही कापूस संकलन केंद्र नव्हते. त्यामुळे शेतकरी आपला कापूस इतर जिल्हे तसेच परराज्यात नेऊन विकत असत. परंतु यावर्षी चामोर्शी तालुक्यात अनखोडा येथे आस्था कापूस जिनिंग फॅक्ट्री सुरू झाल्याने कापूस खरेदी-विक्रीची सुविधा निर्माण झाली. परिणामी शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.कापसाची विक्री करण्यासाठी १ हजार २०० शेतकºयांनी नोंदणी केली आहे. याशिवाय घरी कापूस आहे, मात्र नोंदणी न केलेले शेतकरी अनेक आहेत. अनखोडा येथे सुरू असलेल्या कापूस खरेदी प्रक्रियेला गती नाही. त्यामुळे येथील खरेदी-विक्री प्रक्रियेची मर्यादा उठवून येथे दररोज कापूस खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.लॉकडाऊननंतर भाव घसरलाकोरोना संचारबंदीच्या पूर्वी कापूस फेडरेशनच्या वतीने कापसाला प्रतीक्विं टल ५ हजार ४५० रुपये भाव दिला जात होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात कापूस खरेदी बंद पडली. मात्र अत्यावश्यक सेवा व कृषी क्षेत्रात सवलती देत शासनाने धान व कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यास परवानगी दिली. फेडरेशनच्या वतीने सुरू असलेल्या सदर खरेदी प्रक्रियेत पूर्वीपेक्षा कापसाचा भाव कमी करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत ५ हजार १०० रुपये भाव कापसाला क्विंटलमागे दिला जात आहे. प्रती क्विंटल ३५० रुपये इतका भाव कमी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.

टॅग्स :cottonकापूस