शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेने शिक्षक भरतीतील भ्रष्टाचार संपणार

By admin | Updated: June 19, 2016 01:19 IST

खासगी अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया शासन स्वत: राबविणार आहे.

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत : खासगी शिक्षण संस्थांमधील पदभरती शासन स्वत: करण्याच्या विचारातगडचिरोली : खासगी अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया शासन स्वत: राबविणार आहे. त्यासाठी आॅनलाईन अर्ज मागविले जातील. अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल व या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नेमणूक करणे संबंधित संस्था प्रमुखांवर बंधनकारक राहणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याच वर्षापासून अंमलबजावणी केली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत लोकमतने शनिवारी शिक्षण संस्था प्रमुख, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, बेरोजगार यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या प्रतिक्रियांमध्ये शिक्षण संस्था प्रमुखांनी शासनाच्या या नवीन पद्धतीचा कडाडून विरोध केला आहे. शासनाने असा निर्णय घेतल्यास आपण शाळा शासनाला दान करू मात्र, ज्या इमारतीत आता शाळा भरविली जात आहे, ती इमारत देणार नाही. शासनाने स्वत:च्या इमारती बांधून शाळा चालवाव्या, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर शासनाच्या या नवीन निर्णयामुळे शिक्षक पदभरतीतील भ्रष्टाचार पूर्णपणे नाहिसा होईल. गरीब, होतकरू, हुशार मुलाला शिक्षकाची नोकरी मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास फार मोठी मदत होईल, अशी प्रतिक्रिया शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, बेरोजगार यांनी व्यक्त केली आहे.