शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आठवडा संपूनही 40 हजार विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या शैक्षणिक सत्रात सर्वच शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद हाेती.  विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचे निर्देश शासनामार्फत दिले हाेते. मात्र अनेक पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. कनेक्टीव्हीटीचा अभाव आहे. तसेच ऑनलाईन शिकण्याच्या अनेक मर्यादा आहेत. दिवाळीनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. पुढील चार महिन्यात परीक्षेचा कालावधी येणार आहे. अशास्थितीत शाळा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांचे आणखी माेठे नुकसान हाेण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकाेराेनाची भीती कायमच : अपेक्षेपेक्षा विद्यार्थ्यांची वर्गात उपस्थिती कमी

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शासनाच्या आदेशानुसार २३ नाेव्हेंबरपासून जिल्हाभरातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ४६ हजार ५५० विद्यार्थ्यांपैकी केवळ ६ हजार ९२६ विद्यार्थी उपस्थित आहेत.  उपस्थितीचे प्रमाण १४.८७ टक्के आहे. अजुनही ३९ हजार ६२४ विद्यार्थी शाळेत येत नसल्याचे स्पष्ट हाेत आहे.  काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या शैक्षणिक सत्रात सर्वच शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद हाेती.  विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचे निर्देश शासनामार्फत दिले हाेते. मात्र अनेक पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. कनेक्टीव्हीटीचा अभाव आहे. तसेच ऑनलाईन शिकण्याच्या अनेक मर्यादा आहेत. दिवाळीनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. पुढील चार महिन्यात परीक्षेचा कालावधी येणार आहे. अशास्थितीत शाळा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांचे आणखी माेठे नुकसान हाेण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. पहिल्या दिवशी केवळ पाच टक्के विद्यार्थी उपस्थित हाेते. हळुहळू विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल, असा अंदाज हाेता. मात्र दुसरा आठवडा आता संपण्याच्या मार्गावर आहे. तरीही केवळ १५ टक्के विद्यार्थी हजर आहेत. यातही बहुतांश विद्यार्थी केवळ दहावी व बारावीचे आहेत. नववी व अकरावीचे अनेक विद्यार्थी येत नसल्याची स्थिती आहे.  विद्यार्थी उपस्थितीसाठी पालकाची सहमती आवश्यक केली आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सहमतीपत्र भरवून घेतले जात आहे. मात्र अनेक पालकांनी अजुनही सहमतीपत्र दिले नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी उपस्थिती दिसून येत आहे. मात्र तालुका व जिल्हास्तरावरील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय कमी आहे. काेराेनाचे संकट अजुनही कायम आहे. त्यामुळे बरेचशे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाही. दिवाळीनंतर काेराेना रूग्णांची संख्या वाढली हाेती. मागील पाच ते सहा दिवसांपासून मात्र रूग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे शिक्षकांनी पालकांना मार्गदर्शन करून त्यांचे मन वळविण्याची गरज आहे. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी