शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट समस्येने एटापल्ली तालुकावासीय हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

एटापल्ली : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगडला लागून जारावंडी गाव आहे. या परिसरात ५० ते ६० आदिवासीबहुल गावे आहेत. मात्र ...

एटापल्ली : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगडला लागून जारावंडी गाव आहे. या परिसरात ५० ते ६० आदिवासीबहुल गावे आहेत. मात्र या भागात कोणतीच बँक नसून इंटरनेटच्या सुविधेचा अभाव आहे. परिणामी या भागातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी व नागरिक त्रस्त झाले आहेत.

सद्यस्थितीत बँकेत खाते उघडण्यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच प्रत्येक कामासाठी बँकेचे खाते अनिवार्य करण्यात आले आहेत. प्रत्येक योजनेचा आर्थिक लाभ, कामाच्या मोबदल्याची रक्कम बँकेच्या खात्यावरच जमा केली जात आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेचे अर्थसहाय्य राष्ट्रीयीकृत बँक खात्यामध्ये जमा होते. महिला बचत गटाचा वाढलेला व्याप व विस्तार, वृद्धांना मिळणारे निवृत्ती अर्थसहाय्य, घरकूल योजनेच्या बांधकामाचे अनुदान, रोजगार हमी योजनेच्या कामाचा मोबदला, शेतकऱ्यांची पीक कर्ज, सोनेतारण व इतर प्रकारचे कर्ज तसेच विविध योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत, वैयक्तिक दैनंदिन आर्थिक व्यवहार, असे सर्वच विभाग बँक खात्यामार्फत केले जातात.