शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील आराेग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी जिल्हा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील आराेग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसने आराेग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली आहे.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी गडचिराेली येथील विश्रामगृहात यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरसेवक सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष नंदू वाईलकर, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश रत्नावार, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम मुर्वतकर, जिल्हा उपाध्यक्ष एनएसयुआय गौरव अलाम, काँग्रेस जिल्हा महासचिव अनिल कोठारे, एनएसयुआयचे महासचिव गौरव येनप्रेडीवार, मयूर गावतुरे, रुपेश गुजरकर, रोहित चंदावार, शरद भजभुजे, सोनू कोलते आदी उपस्थित हाेते.

भारतातील २५ मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती अतिशय गंभीर असून, जिल्ह्यात कुठलेही उद्योगधंदे उपलब्ध नाहीत. येथील जनता गोरगरीब असून, त्यांना उपचारासाठी नागपूरला जावे लागते. जिल्ह्यातील जनतेला यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे लवकर भरावीत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.