शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड माफियांच्या इशारावरून झोपडीचे अतिक्रमण हटविले

By admin | Updated: September 16, 2014 23:43 IST

१९७८-१९७९ पासून अतिक्रमणीत झोपडी व वहिवाटीतील सरकारी जमिनीवर दाखल आर नुसार असलेल्या जागेवरील आपली झोपडी महसूल व पोलीस प्रशासनाने शिक्षण संस्थाचालक व शहरातील

गडचिरोली : १९७८-१९७९ पासून अतिक्रमणीत झोपडी व वहिवाटीतील सरकारी जमिनीवर दाखल आर नुसार असलेल्या जागेवरील आपली झोपडी महसूल व पोलीस प्रशासनाने शिक्षण संस्थाचालक व शहरातील काही भूमाफिया राजकारण्यांच्या संगणमताने हटविल्याचा आरोप डाकराम भास्कर कांबळे यांनी केला आहे. डाकराम भास्कर कांबळे यांनी म्हटले आहे की, दिवंगत भास्कर लालाजी कांबळे यांच्या पत्नी अनसूया व मुलगा तसेच विधवा महिला रेखा यांचे सन १९७८-१९७९ पासून अतिक्रमणीत जागेवर झोपडी होती. वहिवाटीतील सरकारी जमिनीवर दाखल आर मध्ये या झोपडीची नोंदही आहे. सदर जमिनीचा पट्टा मिळण्याकरीता व नियमानुकल करण्याकरीता अर्ज केलेला आहे. शासकीय नियमाप्रमाणे दंड व जमिनीच्या नियमानुसार किंमत अतिक्रमणधारक भरण्यास तयार असताना व ही जमिनी राखीव नसताना महसूल व पोलीस प्रशासनाने बळजबरी करून संस्थाचालक व काही राजकीय भूमाफियांच्या इशारावर सदर अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे आपला परिवार पूर्णपणे उघड्यावर आला आहे. अतिक्रमण काढण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना नोटीस देण्यात आलेली नाही. पोलिसांच्या मदतीने बळजबरीने झोपडी तोडण्यात आली. तसेच अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे वृध्द अनुसया कांबळे यांना चक्कर येऊन जमिनीवरच कोसळल्या. त्यांना शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण धनाढ्यांच्या इशारावर काढणाऱ्या पोलीस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा डाकराम कांबळे यांनी दिला आहे. या जागेचा घरपट्टीकरही ग्रामपंचायत आरमोरीकडे आपण गेल्या अनेक वर्षांपासून भरत आहो. ग्रामपंचायत आरमोरीने या झोपडी वजा घराला घर क्रमांकही दिलेला आहे. तसेच महसूल प्रशासनाच्या दप्तरी या जागेची नोंदही भास्कर कांबळे या आपल्या वडीलाच्या नावाने नोंद आहे, असे असताना शिक्षण संस्थानीक व काही भूखंड माफीया यांच्या दबावात ही कारवाई करण्यात आली आहे, असेही कांबळे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)