शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना मिळणार सातव्या वेतनाचे प्रलंबित हप्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या उदासीनतेचा फटका बसलेला असून कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ निधी मंजूर करावा, यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने  धरणे देण्यात आले. या धरणे आंदोलनाला वेतन पथक अधीक्षक दिलीप मिछान यांनी भेट देऊन त्यातील दोन मागण्या मार्गी लागल्या असून, फेब्रुवारी महिन्याची वेतन देयके वेतन पथकात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांच्या निवारणार्थ शासनाला २९ एप्रिल २०२० रोजी पाठवलेल्या नोटीसनुसार १३ मे २०२२ रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान शिक्षण विभाग व वेतन पथकाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन दिले. त्यामुळे आता शाळांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सातव्या वेतनाचे प्रलंबित हप्ते अदा करणार आहेत. जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या उदासीनतेचा फटका बसलेला असून कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ निधी मंजूर करावा, यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने  धरणे देण्यात आले. या धरणे आंदोलनाला वेतन पथक अधीक्षक दिलीप मिछान यांनी भेट देऊन त्यातील दोन मागण्या मार्गी लागल्या असून, फेब्रुवारी महिन्याची वेतन देयके वेतन पथकात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता जून महिन्यात देण्यात येणार असल्याचे उपस्थितांना सांगितले. यावेळी मागण्यांचे निवेदन उपशिक्षणाधिकारी रमेश उचे यांच्यामार्फत शालेय शिक्षण सचिव तसेच शिक्षण आयुक्तांना पाठविण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, बी.बी.पारधी, आर. एस. मेकलवार, किशोर पाचभाई, अजय वर्धालवार, पुरुषोत्तम करकाटे, किशोर राऊत आदी सहभागी हाेते.

 

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोग