शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
4
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
5
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
6
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
7
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
8
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
9
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
10
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
11
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
12
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
13
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
14
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
15
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
16
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
17
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
18
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
19
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
20
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शाळांना वर्ग ५ व ८ जोडू नये

By admin | Updated: May 15, 2014 23:33 IST

नवीन शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ५ वी व ८ वी तील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्यात येणार आहे.

गडचिरोली : नवीन शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ५ वी व ८ वी तील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेशाकरिता सगळीकडे धावपळीची अवस्था निर्माण झाली आहे. प्राथमिक शाळांना वर्ग ५ व ८ जोडले तर त्याचा परिणाम अशासकीय शाळांच्या तुकड्या बंद होण्यावर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना इयत्ता ५ व ८ वीच्या तुकड्या जोडू नये, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली आहे.

काही संघटनांनी गडचिरोली जिल्ह्यात आरटीईच्या कलमामध्ये शिथिलता आणून इयत्ता ५ व ८ वा वर्ग सुरू करण्याची अनुक्रमे १ किमी व ३ किमी अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे अशासकीय माध्यमिक शाळेवर प्रतिकूल परिणाम होईल व विद्यार्थ्यांच्या अभावी तुकड्या बंद होण्याची नामुश्की येईल. पर्यायाने अनेक शिक्षकांच्या समायोजनाचा गंभीर प्रश्न शिक्षण विभागासमोर निर्माण होईल. त्यामुळे गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघाने या मागणीला तीव्र विरोध दर्शविला आहे. आरटीईच्या अटीमध्ये कोणत्याही प्रकारे शिथिलता आणू नये, अशी भूमिका जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतली आहे. प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचे दाखले देऊ नये, शिक्षण विभागाच्या मौखिक सूचनेनुसार दाखले देणे सुरू झालेले नाहीत तरीही काही संघटना आरटीईच्या कलमामध्ये शिथिलता आणून इयत्ता ५ व ८ चा वर्ग सुरू करण्याची १ व ३ किमीची अट रद्द करण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे अशासकीय शाळांवर विपरित परिणाम होण्याची भीती मुख्याध्यापक संघाने व्यक्त केली आहे. शाळा सोडण्याचा दाखला मिळण्याकरिता पालकाने शाळेशी संपर्क केल्यास तो त्वरित देण्यात यावा. त्यात कसल्याही प्रकारचा वेळकाढूपणा करण्यात येऊ नये, अशा सूचना संबंधित विभागाने प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना त्वरित निर्गमित कराव्यात, अशी मागणी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य संजय नार्लावार, सचिव प्राचार्य टी. के. बोरकर, उपाध्यक्ष प्राचार्य महेश तुम्पल्लीवार, प्राचार्य सी. एल. डोंगरवार, प्राचार्य संजय भांडारकर, प्राचार्य मनिष शेटे, प्राचार्य जयंत येलमुले यांनी केली आहे.