शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

वाहक व चालकांअभावी नवीन शेड्यूलला ग्रहण

By admin | Updated: April 27, 2015 01:14 IST

उन्हाळ्यातील गर्दीच्या हंगामाचा फायदा उचलण्याबरोबरच मानव विकास मिशनच्या बसफेऱ्यांना काम देण्याच्या उद्देशाने ...

गडचिरोली : उन्हाळ्यातील गर्दीच्या हंगामाचा फायदा उचलण्याबरोबरच मानव विकास मिशनच्या बसफेऱ्यांना काम देण्याच्या उद्देशाने गडचिरोली आगारातून वाढीव शेड्यूल तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र रिक्त असलेल्या वाहक व चालकांच्या पदामुळे वाढीव शेड्यूल राबविताना अडचण निर्माण होत आहे.
उन्हाळ्यामध्ये लग्नसराईला सुरुवात होते. त्याचबरोबर शेतीचा हंगाम संपत असल्याने उन्हाळ्याच्या कालावधीत सर्वाधिक प्रवास केला जातो. त्यामुळे या कालावधीला एसटीचे कर्मचारी गर्दीचा हंगाम म्हणून ओळखतात. उन्हाळ्यात सर्वच शाळा बंद राहत असल्याने मानव विकास मिशनच्या बसच्या फेऱ्या बंधनकारक मार्गावर चालवाव्या लागत नाही. त्यामुळे या बसला काम देणे आवश्यक आहे. यासाठी गडचिरोली आगाराच्या वतीने नवीन अतिरिक्त शेड्यूल तयार केले जात आहे. नवीन शेड्यूलनुसार बसगाड्या असल्या तरी वाहक व चालक मिळणे कठीण झाले आहे. गडचिरोली आगारातील वाहक व चालकांची जवळपास २० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित शेड्यूलच्या बसगाड्यांनाच कधीकधी कर्मचारी मिळत नाही. तर अतिरिक्त शेड्यूलसाठी कर्मचारी कसे मिळणार असाही प्रश्न काही वाहक व चालकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहक व चालकांच्या रिक्त पदांमुळे नवीन शेड्यूल राबविण्यास गडचिरोली आगाराला अडचण निर्माण होत असून गर्दीच्या हंगामातील उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)