शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात डिझेल २० रुपयांनी, तर खाद्यतेल ७० रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:38 IST

काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या कुटुंबांना कसे तरी जीवन जगावे ...

काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या कुटुंबांना कसे तरी जीवन जगावे लागत आहे. पहिलेच हातात पैसे नाहीत. अशातच किराणा वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. विशेष म्हणजे किराणा वस्तूंमध्ये खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. मागील वर्षी ८० ते ८५ रुपयांना मिळणारे एक लिटर तेलाचे पॅकेट आता १५५ रुपयांपर्यंत पाेहाेचले आहे. म्हणजेच खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे ७० रुपयांची वाढ झाली आहे.

मागील वर्षी मे महिन्यात पेट्राेलचा दर ७० रुपये प्रतिलिटर हाेता. आता हा दर ९० रुपयांवर पाेहाेचला आहे. डिझेलचे दर वाढल्याने वस्तूंचा वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळेच किराणा वस्तूंच्या किमतीही वाढत चालल्या आहेत.

बाॅक्स

काय म्हणतात गृहिणी

काेराेनाच्या या महामारीत खाद्यतेलासह किराणा साहित्याचेही दर वाढले आहेत. किराणा वस्तूंमध्ये खाद्यतेल दर दिवशी वापरली जाणारी वस्तू आहे. मात्र, याची किंमत वर्षभरात दुप्पट झाली आहे. त्यामुळे महिनाभरात किराणावर हाेणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे.

मनीषा नवघडे, गृहिणी

काेराेनामुळे राेजगार गेला आहे. सध्या घरी बसून कसेतरी दिवस काढणे सुरू आहे. घरात काहीही नसले तरी किराणा आवश्यक आहे. मात्र, किराणाचे दर वाढले आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी त्या खरेदी कराव्याच लागणार आहेत.

दामिनी मेश्राम, गृहिणी

दरवर्षी काेणत्याही वस्तूंच्या किमती वाढणे अपेक्षित आहेच. मात्र, खाद्यतेलाची झालेली वाढ अनपेक्षित आहे. वर्षभरात खाद्यतेल दुपटीने वाढले आहे. आताही किमती वाढत आहेत.

लीना चाैधरी, गृहिणी

किराणा दर (प्रती किलाे)

मे २०२१ स्पटेंबर २०२१ मार्च २०२०

बेसन ८० ७५ ७५

गूळ ५८ ५८ ५५

साखर ३८ ३४ ३२

तांदूळ ३० ३० ३०

चना डाळ ७६ ७५ ७०

तूरडाळ ११० १०० १००

खाद्य तेल (प्रती लिटर)

मे २०२१ स्पटेंबर २०२१ मार्च २०२०

शेंगदाना १८० १६० १२०

सर्यफूल १८० १६० १२०

साेयाबीन १५५ १२५ ८०

राईस ब्रॅंड १८० १६० १२०

डिझेलचा भाव (प्रती लिटर)

जानेवारी २०२० ७१

जून २०२० ७८

जानेवारी २०२१ ८३

मे २०२१ ९०