शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मागील वर्षभरात १९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:00 IST

गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपुष्ठात आणण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना २०१७ या संपलेल्या वर्षात चांगलेच यश प्राप्त झाले. वर्षभरात १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर ६७ नक्षलवादी व नक्षल समर्थकांना अटक करण्यात यश मिळाले.

ठळक मुद्दे२२ जणांचे आत्मसमर्पण : ६७ समर्थकांना अटक;नक्षल चळवळ हादरली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपुष्ठात आणण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना २०१७ या संपलेल्या वर्षात चांगलेच यश प्राप्त झाले. वर्षभरात १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर ६७ नक्षलवादी व नक्षल समर्थकांना अटक करण्यात यश मिळाले. तसेच २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.सुरुवातीला राज्याच्या गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि नांदेड या सहा जिल्ह्यात कार्यरत असलेला नक्षलवाद हा आता केवळ गडचिरोली जिल्हा तसेच गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यापुरताच मर्यादित राहिला आहे. नक्षलग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येणाºया लोककल्याणकारी व विकासाच्या विविध योजनांमुळे तसेच पोलिसांचा दुर्गम भागातील ग्रामस्थांशी वाढलेला जनसंपर्क व संवादामुळे शासनाच्या विकासाला जनतेचा पाठींबा मिळू लागला आहे. पोलिसांच्या यशस्वी विशेष रणनितीमुळे २०१७ या वर्षात नक्षली चळवळीला मोठ्या प्रमाणात हादरा बसून नक्षल चळवळीची मोठी हानी झाली आहे. नक्षल्यांबरोबरीच्या लढाईत पोलिसांनी उत्तम कामगिरी राहिली.२०१७ या वर्षात एकूण १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले. यामध्ये मात्र ३ पोलिस शहीद झाले. पोलिसांनी ६७ नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक करण्यातही यश मिळविले असून २२ नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारला. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा फटका बसला. १८१ गावांनी गावबंदी ठराव करून नक्षल्यांना गावाबाहेरच रोखल्यामुळे नक्षल्यांचा जनाधार ओसरला. या वर्षात मोठ्या प्रमाणावर नक्षली मारले गेल्यामुळे नक्षल्यांचे संख्याबळही कमी झाले आहे. एकीकडे आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन अनेक नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करीत असल्यामुळे नक्षल्यांना संख्याबळही टिकविने अवघड झाले आहे.दुर्गम भागातून नक्षल्यांचा जनाधार घसरलानक्षलग्रस्त व दुर्गम भागातील स्थानिक जनतेने नक्षल्यांना गावबंदी करून शासनाच्या विकासाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे नक्षल भरतीसाठी तरूण मिळत नसल्याने नक्षल्यांची चळवळ कमकुवत झाली आहे. पोलिसांच्या यशस्वी रणनितीमुळेच नक्षल्यांचा मुख्य गड असलेल्या अबुझमाड जंगलातील शिबीर उध्वस्त झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये स्थानिक गावकºयांनी नक्षली बॅनर, नक्षल नेत्यांचे पुतळे जाळल्याने, तसेच नक्षल स्मारक तोडल्यामुळे उरलेला जनाधारही नक्षल्यांचा कमी झालेला आहे. असल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे.पोलिसांनी नक्षलग्रस्त व दुर्गम भागात जनसंपर्क वाढवून स्थानिक जनतेचा विश्वास संपादन केला. तसेच ग्रामभेट, जनजागरण मेळावे आदी उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांशी समन्वय ठेवून नागरीकांच्या समस्या पोलिसांकडून नियमित सोडविल्या जात असल्यामुळे जनतेचा शासनावर विश्वास वाढला आहे. नक्षली केवळ दिशाभूल करीत असल्याची जाणीव नक्षलग्रस्त भागातील नागरीकांना झाली असल्यामुळे त्यांनी शासनाच्या विकासाला होकार व नक्षल्यांना नकार दिला आहे.-शरद शेलार, पोलीस महानिरीक्षक तथानक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख