बँक अधिकाऱ्यांची असंवेदनशीलतेमुळे कोमातील वृद्धेला न्यावे लागले थेट बँकेत ! गडचिरोलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 13:57 IST2026-02-28T13:57:05+5:302026-02-28T13:57:29+5:30
Gadchiroli : बँक ऑफ महाराष्ट्रच्या पोर्ला शाखेचा भोंगळ कारभार आणि अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. एका कोमात गेलेल्या वृद्ध महिलेला पैशांसाठी चक्क चारचाकी वाहनाने बँकेच्या दारात आणण्याची वेळ आली.

Due to the insensitivity of bank officials, an elderly person in a coma had to be taken directly to the bank! Incident in Gadchiroli
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बँक ऑफ महाराष्ट्रच्या पोर्ला शाखेचा भोंगळ कारभार आणि अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. एका कोमात गेलेल्या वृद्ध महिलेला पैशांसाठी चक्क चारचाकी वाहनाने बँकेच्या दारात आणण्याची वेळ आली. या प्रकारामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात असून, संबंधित व्यवस्थापकाची तत्काळ बदली करण्याची मागणी जोर धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काटली येथील रहिवासी शांताबाई मानकर या मागील काही दिवसांपासून कोमात आहेत. त्यांच्या औषधोपचारासाठी पैशांची गरज असल्याने त्यांची मुलगी व जावई २५ फेब्रुवारी रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पोर्ला येथे गेले होते. त्यांनी वृद्धेच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे काढण्याची विनंती केली. मात्र, शाखा व्यवस्थापकाने "खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे देणार नाही", अशी आडमुठी भूमिका घेत त्यांना परत लावले.
खातेदार गंभीर आजारी असेल, तर बँकेने मेडिकल सर्टिफिकेट मागविणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता कोमात असलेल्या महिलेला बँकेत आणण्यास भाग पाडले गेले. शेवटी हतबल नातेवाइकांनी किरायाची गाडी करून वृद्धेला बँकेत नेले.