शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: June 12, 2016 01:15 IST

शहरातील जुना बसस्थानक चौक ते नगर पंचायतीकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत अतिक्रमीत दुकाने व रस्त्याच्या बाजुला उभी ठेवलेली वाहने यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून

कुरखेडा गावाची व्यथा : व्यावसायिकांच्या वाढत्या अतिक्रमणाकडे नगर पंचायतीचे होत आहे दुर्लक्षकुरखेडा : शहरातील जुना बसस्थानक चौक ते नगर पंचायतीकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत अतिक्रमीत दुकाने व रस्त्याच्या बाजुला उभी ठेवलेली वाहने यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. देसाईगंज-कुरखेडा-कोरची या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजुला बाजारपेठ वसली आहे. सदर मार्ग कुरखेडा शहराच्या अगदी मध्यभागातून जाते. जुना बसस्थानक ते ए टू झेड मोबाईल गॅलरीच्या दुकानापर्यंत मार्केटलाईन आहे. दुकानदार दुकानातील सामान रस्त्याच्या बाजुला आणून मांडतात. त्यामुळे वाहनांना उभे ठेवण्यासाठी जागा राहत नाही. त्यामुळे वाहने रस्त्यावरच उभी ठेवली जातात. परिणामी एसटी, ट्रक यासारखी मोठी वाहने आल्यास वाहतुकीचा अडथळा निर्माण होते. मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरून मालवाहू वाहने सुध्दा दिवसभर ये-जा करतात. परिणामी वाहतुकीची कोंडी सुध्दा दिवसभर चालते. शनिवारी दुपारच्या सुमारास अशीच वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. प्रभारी पोलीस अधिकारी सुधीर कटारे यांनी घटनास्थळ गाठून खासगी प्रवासी वाहने व इतर वाहनचालकांना तंबी देऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. (तालुका प्रतिनिधी)